मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसचा स्मार्टफोन वनप्लस 2 ला खरेदी करण्यासाठी निमंत्रणाची गरज पडत होती, मात्र हे ५ डिसेंबरनंतरच आपल्याला ह्याची गरज नाही. खरे पाहता, कंपनीने अशी माहिती दिली आहे की, 5 डिसेंबरनंतर वनप्लस 2 स्मार्टफोन आपल्याला ओपन सेलमध्ये मिळेल.
जर वनप्लस2 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले (1920x1080p) रिझोल्युशनसह दिली आहे. त्याचबरोबर ह्यात क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरसह 4GB ची रॅम दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल फ्लॅशसह दिला आहे. त्याचबरोबर ह्या कॅमे-यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि ऑटो फोकससुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात f/2.0 अॅपर्चर आणि 4K व्हिडियो सुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये युएसबी टाइप-Cसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्याच्या हार्डवेअरमध्येही काही बदल केले गेले आहेत. स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला एक स्लायडर बटन दिले आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर होम बटन फिंगरप्रिंट सेंसरसह दिला गेला आहे. हा पाच फिंगरप्रिंट्सला स्टोर करण्यात सक्षम आहे.
हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो आपल्याला LTE सपोर्टसह मिळतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 3300mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएसवर चालतो.