OnePlus Community Sale: फ्लॅगशिप किलरच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर Discount, पहा यादी 

OnePlus Community Sale: फ्लॅगशिप किलरच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर Discount, पहा यादी 
HIGHLIGHTS

Amazon India वर OnePlus Community Sale लाईव्ह आहे.

कंपनीच्या अधिकतर स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत.

फोनवर ICICI बँकेकडून 3000 रुपयांची सूट दिली जात आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या इ- कॉमर्स साईट Amazon India वर OnePlus Community Sale लाईव्ह आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन ब्रँडची लोकप्रिय उपकरणे उपलब्ध आहेत. कंपनीच्या अधिकतर स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स, EMI इ. ऑफर्स उपलब्ध करून दिले गेले आहेत. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या निवडक फोनबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार प्रसिद्ध स्मार्टफोन्स, Redmi, Vivo फोन्स समाविष्ट

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE 4 Lite 5G
#OnePlus Nord CE 4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite ची किंमत 17,999 रुपये इतकी सूचिबद्ध करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, 873 रुपयांचा EMI मोबाईल फोनवर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंजसाठी असेल तर, या डिव्हाइसवर 16,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. मात्र, चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असावी. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

OnePlus Nord 4 5G

OnePlus Nord 4 5G Price Cut

OnePlus Nord 4 5G फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेकडून 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच. सहज खरेदी करण्यासाठी, या हँडसेटवर 1,357 रुपयांचा EMI पर्याय मिळेल. एवढेच नाही तर, तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंजसाठी असेल तर, यावर 26,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर आणि AI वैशिष्ट्ये आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus 12R

OnePlus 12R स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 38,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 1,891 रुपयांचा EMI दिला जात आहे. तसेच, या फोनवर ICICI बँकेकडून 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि 16GB पर्यंत रॅम आहे. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि मजबूत 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo