OnePlus च्या फोन्स, टॅब्स आणि स्मार्टवॉचेसवर मिळेल भारी Discount, कम्युनिटी सेलची घोषणा। Tech News

Updated on 05-Jun-2024
HIGHLIGHTS

फ्लॅगशिप किलर OnePlus ने केली Oneplus कम्युनिटी सेलची घोषणा

Oneplus कम्युनिटी सेल 6 जूनपासून सुरू होईल आणि 11 जूनपर्यंत सुरु राहील.

सेलदरम्यान सर्वात मोठ्या ऑफर्स नंबर सीरीजवर उपलब्ध असतील.

OnePlus ने आपल्या स्मार्टफोन्स आणि इतर लोकप्रिय उपकरणांसाठी कम्युनिटी सेलची घोषणा केली आहे. या सेलदरम्यान, युजर्सना बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI ऑफर्ससह विविध फोन आणि इतर गॅजेट्सवर तब्बल 5,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही सेल उद्यापासून म्हणजेच 6 जूनपासून सुरू होईल आणि 11 जूनपर्यंत सुरु राहील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus कम्युनिटी सेलमध्ये काय मिळणार विशेष?

OnePlus कम्युनिटी सेल

OnePlus कम्युनिटी सेलदरम्यान रग्ड फ्लॅगशिप डिव्हाइसेस OnePlus 12 आणि OnePlus 12R, OnePlus Open, Nord CE4 आणि OnePlus Pad तसेच OnePlus Watch 2 सारख्या निवडक OnePlus इकोसिस्टम डिव्हाइसेसवर ऑफर्स मिळतील. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या सेलदरम्यान सर्वात मोठ्या ऑफर्स नंबर सीरीजवर उपलब्ध असतील.

OnePlus 12 सिरीजवर मिळतील भारी ऑफर्स

सेलदरम्यान, लेटेस्ट OnePlus 12 फोनवर 3,000 रुपयांची झटपट बँक सूट आणि 2,000 रुपयांचे स्पेशल डिस्काउंट कूपन मिळणार आहे. त्याबरोबरच, प्रमुख बँक कार्ड्सने पेमेंट व्यवहार केल्यास 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI आणि पेपर फायनान्सवर 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑफर मिळेल. त्याबरोबरच, OnePlus एक्सचेंज व्हॅल्यूसह 12,000 रुपयांचा बोनस मिळू शकतो.

विशेष म्हणजे या सेलदरम्यान OnePlus 12 चा नवीन ग्लेशियल व्हाईट कलर देखील उपलब्ध असेल. जो भारतीय बाजारात प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त, OnePlus 12R मोबाईलवर 2,000 रुपयांची झटपट बँक सूट आणि 2,000 रुपयांचे स्पेशल डिस्काउंट कूपन मिळू शकते. तसेच, ICICI बँक, HDFC बँक, OneCard, BOBCARD आणि IDFC फर्स्ट बँक कार्ड्सवर ऑफर्स उपलब्ध असतील.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, या ऑफर Amazon, OnePlus Online Store, OnePlus Experience Store आणि निवडक प्रमुख रिटेल चॅनेलवर दिले जातील.

OnePlus Open वर भारी ऑफर्स

OnePlus चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी केल्यावर वापरकर्त्यांना 2 स्मार्टवॉच मोफत दिले जातील. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI, HDFC, OneCard, BOBCARD आणि IDFC फर्स्ट कार्ड्सवरून 5000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.

OnePlus Pad आणि स्मार्टवॉचेसवरील ऑफर्स

OnePlus पॅड खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना 3,000 रुपयांचे कुपन मिळणार आहे. तर, Pad Go वर 2,000 रुपये विशेष किंमतीचे कूपन मिळेल. दोन्ही टॅबलेट मॉडेल्सवर ICICI, HDFC, OneCard, BOBCARD आणि IDFC फर्स्ट बँकेकडून 5,000 आणि 2,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, OnePlus Watch 2 वर 2,000 रुपयांची सूट मिळेल. त्याबरोबरच, तुम्ही स्मार्टवॉचवर 2000 रुपयांपर्यंत बँक सवलत देखील मिळवू शकता. याशिवाय, 2 ते 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI ची ऑफर देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :