OnePlus Affordable Smartphones: प्रीमियम फीचर्ससह येणारे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमतही कमी

OnePlus Affordable Smartphones: प्रीमियम फीचर्ससह येणारे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमतही कमी
HIGHLIGHTS

OnePlus कंपनीला 'फ्लॅगशिप किलर' देखील म्हटले जाते.

कंपनीने परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करून दिले.

OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये

OnePlus Affordable Smartphones: OnePlus चे प्रोडक्ट्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीला 'फ्लॅगशिप किलर' देखील म्हटले जाते. कारण कंपनीने परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या कंपनीचे स्मार्टफोन ग्राहकांमध्ये बरेच पॉप्युलर आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला OnePlusच्या अशाच परवडणाऱ्या स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. 

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन हा या यादीतील पहिला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आला आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. Nord CE 3 Lite नवीन डिझाइन आणि पावरफुल फीचरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 108MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 5G

OnePlus Nord CE 5G फोनची सुरुवातीची किंमत फक्त 22,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. हा OnePlus मोबाइल फोन ब्लू व्हॉइड, चारकोल इंक आणि सिल्व्हर रे कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 750G 5G चिपसेटवर चालतो.

OnePlus Nord 2 5G

OnePlus Nord 2 5G फोन भारतात तीन प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन 27,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन MediaTek Dimensity 1200 AI चिपसेटवर काम करतो. फोनच्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX766 + 8MP अल्ट्रा वाइड लेन्स + 2MP मोनो लेन्स आहे आणि हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP Sony IMX615 सेन्सरला सपोर्ट करतो. 

OnePlus 8T

OnePlus 8T कंपनीच्या वेबसाइटवर 23,999 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. ही किंमत फोनच्या 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंटची आहे. फोटोग्राफीसाठी, मागील पॅनेलमध्ये 16MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP मोनोक्रोम लेन्ससह 48MP Sony IMX586 सेन्सर आहे, तर OnePlus 8T फ्रंट पॅनलमध्ये 16MP Sony IMX471 सेल्फी सेन्सर आहे.

OnePlus Nord CE 2

OnePlus Nord CE 2 स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. OnePlus Nord CE 2 चे एक मोठे फीचर म्हणजे फोनमध्ये उपस्थित असलेला 64 मेगापिक्सेल कॅमेरा होय. सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 MP मॅक्रो लेन्स देखील आहे आणि फ्रंट पॅनलवर 16MP Sony IMX471 सेन्सर आहे. हा फोन 65W SUPERVOOC चार्जिंगसह 4,500 mAh बॅटरीला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo