OnePlus Ace 2 Pro Launch: लोकप्रिय कंपनीने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Ace 2 Pro Launch: लोकप्रिय कंपनीने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

OnePlus ने अखेर त्याच्या Ace सिरीजमध्ये नवीन मोबाईल OnePlus Ace 2 Pro समाविष्ट केले आहे.

. हा स्मार्टफोन मेटॅलिक अरोरा ग्रीन आणि टायटॅनियम ग्रे अशा दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल Samsung S5K3P9 लेन्स आहे.

लोकप्रिय कंपनी OnePlus ने अखेर त्याच्या Ace सिरीजमध्ये नवीन मोबाईल OnePlus Ace 2 Pro समाविष्ट केले आहे. कंपंनीने हा फोन सध्या चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेत सादर केला आहे. यूजर्सना डिवाइस मध्ये अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स मिळत आहेत. बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. 

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने OnePlus चे नवीन फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनच्या बेस मॉडेलची किंमत 12 GB RAM + 256 GB स्टोरेज CNY 2,999 म्हणजेच सुमारे 34,500 रुपये आहे. 16 GB RAM + 512 GB स्टोरेजची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आहे. तर, टॉप मॉडेल 24GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,999 रुपये म्हणजेच सुमारे 45,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मेटॅलिक अरोरा ग्रीन आणि टायटॅनियम ग्रे अशा दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल. 

OnePlus Ace 2 Pro फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

 OnePlus Ace 2 Pro मध्ये 6.74-इंच लांबीची OLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. OLED डिस्प्ले LCDच्या तुलनेत चांगले कॉन्ट्रास्ट, अधिक व्हायब्रंट कलर्स ऑफर करतात. OnePlus Ace 2 Pro मजबूत Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 कालांतराने फोनचे कार्यप्रदर्शन खूप चांगले राखून ठेवते, तसेच यासह तुम्हाला हाय परफॉर्मन्स मिळेल. यात ग्राफिक्ससाठी Adreno 740 GPU आहे.

फोटोग्राफीसाठी Ace 2 Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप लावण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल IMX890 प्राइमरी लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल Samsung S5K3P9 लेन्स आहे.

OnePlus Ace 2 Pro डिव्हाइसमध्ये 150W जलद चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरी सपोर्ट आहे. ज्याच्या मदतीने अवघ्या 17 मिनिटांत फोन चार्ज होऊ शकतो. तसेच, सामान्य वापरावर ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकू शकते. यात ड्युअल सिम 5G, वाय-फाय 7, ब्लूटूथ, NFC, GPS, USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo