त्वरा करा ! OnePlus 9 Pro फोन झाला स्वस्त, जाणून घ्या स्मार्टफोनची नवी किंमत

Updated on 27-Aug-2022
HIGHLIGHTS

OnePlus 9 Pro फोनच्या किमतीत पुन्हा एकदा कपात

या स्मार्टफोनवरील ही तिसरी कपात आहे

स्मार्टफोनची सुरुवातीची नवीन किंमत 49,999 रुपयांना

OnePlus वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने 2021 मधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन OnePlus 9 Pro च्या किमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. या फोनच्या किंमतीत ही तिसरी कपात आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, OnePlus 9 Pro ची किंमत 5,800 रुपयांनी कमी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या फोनची किंमत 4,200 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : दररोज 2 GB डेटासह RELIANCE JIO, AIRTEL आणि VI चे प्लॅन्स, बघा यादी

OnePlus 9 Pro ची नवीन किंमत

OnePlus 9 Pro स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB+256GB दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 8GB व्हेरिएंट 54,199 रुपयांना उपलब्ध होते आणि 12GB मॉडेल 59,199 रुपयांना विकले जात होते. आता नवीन कपातीनंतर, 8GB व्हर्जन 49,999 रुपयांना आणि 12GB व्हेरिएंट 54,999 रुपयांना खरेदी करता येईल. Amazon आणि Flipkart वरून फोन खरेदी केल्यावर तुम्हाला बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील.

OnePlus 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 Pro 5G मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा क्वाड HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 

OnePlus 9 Pro 5G मध्ये क्वाड-रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP मुख्य सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 8MP टेलिफोटो लेन्स आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा समाविष्ट आहे. समोर 16MP सेल्फी शूटर आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :