OnePlus 6T मोबाईल फोन आज रात्री 8:30 वाजता होईल लॉन्च, असे बघा लाइव स्ट्रीमिंग

Updated on 29-Oct-2018
HIGHLIGHTS

OnePlus 6T आज न्यू यॉर्क मध्ये आयोजित इवेंट मधून लॉन्च केला जाईल आणि उद्या कंपनी भारतात अजून एक लॉन्च इवेंट पण आयोजित करेल.

अनेक लीक्स आणि रुमर्स नंतर आज वनप्लस न्यू यॉर्क मधील Pier 36 मध्ये आयोजित इवेंट मधून आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 6T लॉन्च करेल. स्मार्टफोन बद्दल आलेल्या मागील लीक्स आणि रुमर्स मधून डिवाइस बद्दल खूप माहिती आधीच समोर आली आहे. वनप्लस ने आधीच खुलासा केला आहे कि डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 3700 mAh ची बॅटरी देण्यात येईल आणि यावेळी डिवाइस मध्ये 3.5mm चा ऑडियो जॅक दिला जाणार नाही. खाली आम्ही OnePlus 6T च्या स्पेक्स आणि किंमतीसह लॉन्च केलं जाऊ शकतो तसेच तुम्ही इवेंटची लाइव स्ट्रीमिंग कशी बघू शकता याची माहिती दिली आहे. 

अशी बघा OnePlus 6T लॉन्चची लाइव स्ट्रीमिंग
आजचा इवेंट वनप्लस च्या सोशल मीडिया चॅनेल्स वर पण स्ट्रीम केला जाईल पण तुम्ही डायरेक्ट खाली दिलेल्या एम्बेडेड विडियो वर जाऊन पण इवेंटची लाइव स्ट्रीमिंग बघू शकता. हा इवेंट 11 am EDT म्हणजे 8:30 pm IST (भारतात रात्री 8:30 वाजता) सुरु होईल. 

OnePlus 6T स्पेसिफिकेशन
कंपनीच्या मागील फोन OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC वर चालेल. फोन गीकबेंच आणि अनटूटू वरील लीक्स मध्ये पण फ्लॅगशिप प्रोसेसर वर चालताना दिसला आहे. गीकबेंच वर डिवाइस एंड्राइड पाई सह लिस्टेड झाल्याचे दिसले होते तिथे डिवाइसला सिंगल कोर टेस्ट मध्ये 2510 स्कोर आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 8639 स्कोर मिळाला होता. डिवाइसला अनटूटू वर 297132 स्कोर मिळाला आहे. 

नुकतीच OnePlus 6T ची स्पेसिफिकेशन शीट आणि प्रमोशनल इमेज लीक झाली होती. नवीन फोटो मध्ये डिवाइस मधील वॉटर ड्राप नॉच डिस्प्ले दिसत आहे. OnePlus 6T मध्ये 6.4 इंचाचा ऑप्टिक AMOLED डिस्प्ले देण्यात येईल जो 1080 x 2340 पिक्सल च्या फुल HD+ रेजोल्यूशनचा असेल आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल. हि वॉटर ड्राप नॉच ओप्पो आणि विवो च्या मिड रेंज फोन्स मध्ये दिसलेल्या नॉच प्रमाणे आहे. हॅण्डसेटचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के आहे आणि याला गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. 

OnePlus 6T स्पेसिफिकेशन शीट वरून माहिती मिळाली आहे कि डिवाइस 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज (माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट विना) सह सादर केला जाऊ शकतो. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 16MP + 20MP चा डुअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे आणि दोन्ही सेंसर्स f/1.7 अपर्चर सह येतील. कंपनी ने सांगितले आहे कि फोनच्या कॅमेरा मध्ये नवीन ‘नाईट मोड’ पण सामील केलं आहे, जो लो-लाइट मध्ये चांगले फोटो घेण्यास मदत करेल. फोनचा कॅमेरा क्विक कॅप्चर, पोर्ट्रेट मोड आणि HD रेजोल्यूशन मध्ये सुपर स्लो-मो विडियो अश्या फीचर्स सह येईल. फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा असेल ज्याचा अपर्चर f/1.7 असेल. 

OnePlus 6T या किंमतीत होऊ शकतो लॉन्च
अजूनतरी OnePlus 6T च्या भारतातील किंमतीबद्दल कोणतेही लीक समोर आलेले नाही. पण एका जर्मन रिटेलरच्या वेबसाइट वर डिवाइसचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट €580 (Rs 48,370) मध्ये लिस्टे करण्यात आला आहे. अशा आहे कि भारतात डिवाइस Rs 36,000 च्या बेस किंमतीत सादर केला जाईल. युजर्स भारतात अमेझॉन इंडिया वर OnePlus 6T प्री-बुक करू शकतात आणि नवीन वनप्लस टाइप-C बुलेट इयरफोन्स तसेच ऍमेझॉन पे अकाउंट मध्ये 500 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. विशेष म्हणजे OnePlus Type C बुलेट इयरफोन्सची किंमत Rs 1,490 आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :