OnePlus ने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे कि त्यांचा OnePlus 6T Thunder Purple कलर वेरीएंट 16 नोव्हेंबर, 2018 पासून भारतात सेल साठी उपलब्ध होणार आहे, आणि या डिवाइसची किंमत Rs 41,999 असू शकते. हा मोबाईल फोन तुम्ही एकाच वेरीएंट म्हणजे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह घेऊ शकता. कदाचित येत्या काळात तुम्ही या डिवाइसचा दुसरा वेरीएंट पण विकत घेऊ शकाल पण सध्यातरी तुम्ही याचा हाच मॉडेल विकत घेऊ शकाल.
पण अजून OnePlus कडून OnePlus च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वाल्या आपल्या या स्मार्टफोनचे इतर कलर वेरीएंट येणार आहेत कि नाही याबद्दल कोणतीही बातमी देण्यात आलेली नाही. हा डिवाइस अमेझॉन इंडिया, Oneplus.in, रिलायंस डिजिटल आणि क्रोमा स्टोर्स वरून विकत घेता येईल,तसेच तुम्ही ऑफलाइन पण हा डिवाइस वनप्लस स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.
वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही 16 नोव्हेंबर पासून अमेझॉन इंडिया आणि Oneplus.in वरून हा डिवाइस विकत घेता येईल, हा सेल 2:00PM वाजता सुरु होणार आहे, तसेच तुम्ही हा क्रोमा, रिलायंस डिजिटल आणि अन्य सर्व OnePlus स्टोर्स वरून घेऊ इच्छित असाल तर याचा सेल 11:00 AM वाजताच सुरु होणार आहे. हा डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह मिळेल , तसेच याच किंमतीती म्हणजे Rs 41,999 मध्ये तुम्हाला OnePlus 6T चा मिडनाइट ब्लॅक आणि मिरर ब्लॅक वेरीएंट पण मिळतात.
आतापर्यंतच्या लॉन्च ऑफर्स बद्दल बोलायचे तर तुम्ही हा डिवाइस HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून विकत घेतल्यास तुम्हाला Rs 1,500 चा कॅशबॅक मिळेल. तसेच रिलायंस जियोच्या अनलॉक द स्पीड ऑफर अंतर्गत तुम्हाला Rs 5,400 चा इंस्टेंट कॅशबॅक पहिल्या रिचार्जवर मिळेल जो तुम्ही Rs 299 ने www.jio.com, रिलायंस डिजिटल स्टोर, माय जियो स्टोर्स, जियो रिटेलर्स आणि माय जियो ऍप वरून करू शकता. हा Rs 299 वाला प्रीपेड रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वनप्लस चा हा डिवाइस 3GB 4G डेटा रोज सह मिळेल, तसेच तुम्हाला यात अनलिमिटेड कॉलिंग, SMS आणि जियो ऍप्सचा कॉन्टेंट एक्सेस पण मिळणार आहे.