OnePlus 6T च्या रिटेल बॉक्स वरून वॉटर ड्रॉप नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा झाला खुलासा
OnePlus 6T मध्ये नवीन वॉटर-ड्राप स्टाइल नॉच असेल.
OnePlus चा पुढील फ्लॅगशिप OnePlus 6T यावर्षी नोव्हेंबर पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो आणि काही दिवसांपूर्वी डिवाइस च्या रिटेल बॉक्सचे फोटो समोर आले आहेत. फोटो वरून फोनच्या स्पेक्सचा खुलासा होत आहे.
OnePlus 6T मध्ये OnePlus 6 प्रमाणे नॉच असेल पण हा आधीच्या फोन मधील नॉच प्रमाणे मोठा नसेल. हा नवीन वॉटर-ड्राप स्टाइल नॉच असेल. नॉच मध्ये फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. नॉचच्या वर इयरपीस साठी जागा आहे.
रिटेल बॉक्स बघून वाटते की डिवाइसच्या फ्रंटला फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. पण, याची पोजीशन OnePlus 5 सारखी नसेल. यावेळी फिंगरप्रिंट सेंसर डिस्प्ले च्या आत असेल.
हा रिटेल बॉक्स थोडा वेगळा आहे. हा मार्बल सारखा दिसतो आणि OnePlus च्या आधीच्या डिवाइसेजच्या बॉक्स प्रमाणे प्लेन वाइट नसेल. याच्या फ्रंटला मोठया फॉण्ट मध्ये 6 हा अंक लिहिण्यात आला आहे आणि टॉपला OnePlus लॉगो आहे. याच्या डावीकडे फोन चे नाव OnePlus 6T लिहिण्यात आले आहे आणि उजवीकडे “अनलॉक द स्पीड” लिहिण्यात आले आहे.
OnePlus 6T मध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल आणि हा 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज सह येऊ शकतो. डिवाइस मध्ये AMOLED डिस्प्ले असेल ज्याची साइज 6 इंचांपेक्षा जास्त असू शकते. पण हा OnePlus 6 पेक्षा थोडा महाग असू शकतो.