OnePlus 6T भारतात Rs 37,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च

Updated on 31-Oct-2018
HIGHLIGHTS

OnePlus 6T भारतात Rs 37,999 च्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे आणि डिवाइसचा सेल 1 नोव्हेंबर पासून अमेझॉन वर सुरु होईल.

न्यू यॉर्क मध्ये आयोजित इवेंट मधून OnePlus 6T च्या लॉन्च नंतर लगेचच आता 30 ऑक्टोबरला डिवाइस भारतात पण लॉन्च करण्यात आला आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, वॉटरड्रॉप नॉच अश्या नवीन फीचर्स सह लॉन्च करण्यात आला आहे. डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86% आहे. हा स्मार्टफोन ऑक्सीजन OS वर चालतो जो कि एंड्राइड 9 पाई वर आधारित आहे.
OnePlus 6T ची किंमत आणि लॉन्च ऑफर
OnePlus 6T च्या 6GB+128GB वेरीएंटची किंमत Rs 37,999 ठेवण्यात आली आहे, तर 8GB+128GB वेरीएंट Rs 41,999 मध्ये सादर करण्यात आला आहे आणि 8GB+256GB वेरीएंट बद्दल बोलायचे तर हा वेरीएंट Rs 45,999 मध्ये विकत घेता येईल. हे तिन्ही वेरीएंट अमेझॉन इंडिया आणि वनप्लस च्या ऑनलाइन स्टोर्स वरून विकत घेता येतील. तसेच OnePlus 6T देशात पॉप-अप स्टोर्स वर पण उपलब्ध होईल. स्मार्टफोनची शिपिंग 1 आणि 3 नोव्हेंबर पासून सुरु होईल. फोन वनप्लस ऑफलाइन स्टोर्स, रिलायंस डिजिटल आणि क्रोमा स्टोर्स वरून विकत घेता येईल. जियो युजर्सना OnePlus 6T च्या खरेदीवर Rs 5,400 कॅशबॅक, 3TB 4G डेटा मिळेल. या ऑफर बद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
OnePlus 6T स्पेसिफिकेशंस
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI तेच. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे.

अपेक्षेप्रमाणेच OnePlus 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तर डिवाइस दोन वेरिएंट्स 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. हा LPDDR4X रॅम आणि UFS 2.1 2-लेन स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन लेटेस्ट ऑक्सीजन OS वर लॉन्च करण्यात आला आहे जो एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. नवीन OS अनेक सुधार आणि नवीन फीचर्स सह येतो ज्यात अपडेट झालेला गेमिंग मोड आणि स्मार्ट बूस्ट इत्यादींचा समावेश आहे ज्यामुळे ऍप स्टार्ट अप टाइम 5-20 टक्क्यांनी वाढला आहे.
OnePlus 6T कॅमेरा
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर OnePlus 6T मध्ये मागील OnePlus 6 प्रमाणे सारखाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या रियर वर 16 आणि 20 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जे क्रमश: Sony IMX 519 आणि Sony IMX 376K सेंसर्स आहेत. 16MP च्या प्राइमरी कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.7 आहे आणि हा 1.22µm पिक्सल साइज सह येतो तर दुसरा 20 मेगापिक्सलचा सेंसर f/1.7 अपर्चर आणि 1.0µm पिक्सल साइज सह येतो.

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 16 मेगापिक्सलच्या Sony IMX 371 सेंसर सह येतो ज्याचे अपर्चर f/2.0 आहे आणि हा EIS व 1.0µm पिक्सल साइज सह येतो. OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T मध्ये पण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन नॉच हाईड करता येते. OnePlus 6T मध्ये 3700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :