OnePlus 6T आज भारतात होईल लॉन्च, बघा लाइव स्ट्रीमिंग

Updated on 30-Oct-2018
HIGHLIGHTS

OnePlus 6T आज भारतात लॉन्च केला जाईल आणि 1 नोव्हेंबर पासून डिवाइसचा सेल अमेझॉन इंडिया, वनप्लसच्या अधिकृत वेबसाइट तसेच ऑफलाइन स्टोर्स वर सुरु होईल.

शेनझेन मधील निर्माता OnePlus ने 29 ऑक्टोबरला OnePlus 6T स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केला आहे आणि आज हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार आहे. हा इवेंट नवी दिल्ली मध्ये आज रात्री 8:30 वाजल्यापासून सुरु होईल. कंपनी आपल्या यूट्यूब चॅनेल वर इवेंटची लाइव स्ट्रीमिंग पण सुरु करेल जी जो रात्री 8:30 पासून सुरु होईल. 

वनप्लस 6T कंपनीचा पहिला असा डिवाइस आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर करण्यात आला आहे आणि या डिवाइस मध्ये 3.5 mm ऑडियो जॅक नाही तसेच डिवाइसच्या डिस्प्ले मध्ये नवीन वॉटरड्रॉप नॉच पण देण्यात आली आहे. 

OnePlus 6T स्पेसिफिकेशंस
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI तेच. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे. 

अपेक्षेप्रमाणेच OnePlus 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तर डिवाइस दोन वेरिएंट्स 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. हा LPDDR4X रॅम आणि UFS 2.1 2-लेन स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन लेटेस्ट ऑक्सीजन OS वर लॉन्च करण्यात आला आहे जो एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. नवीन OS अनेक सुधार आणि नवीन फीचर्स सह येतो ज्यात अपडेट झालेला गेमिंग मोड आणि स्मार्ट बूस्ट इत्यादींचा समावेश आहे ज्यामुळे ऍप स्टार्ट अप टाइम 5-20 टक्क्यांनी वाढला आहे. 

OnePlus 6T कॅमेरा
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर OnePlus 6T मध्ये मागील OnePlus 6 प्रमाणे सारखाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या रियर वर 16 आणि 20 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जे क्रमश: Sony IMX 519 आणि Sony IMX 376K सेंसर्स आहेत. 16MP च्या प्राइमरी कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.7 आहे आणि हा 1.22µm पिक्सल साइज सह येतो तर दुसरा 20 मेगापिक्सलचा सेंसर f/1.7 अपर्चर आणि 1.0µm पिक्सल साइज सह येतो. 

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 16 मेगापिक्सलच्या Sony IMX 371 सेंसर सह येतो ज्याचे अपर्चर f/2.0 आहे आणि हा EIS व 1.0µm पिक्सल साइज सह येतो. OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T मध्ये पण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन नॉच हाईड करता येते. OnePlus 6T मध्ये 3700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

वनप्लस ने अमेझॉन इंडिया सोबत भागीदारी केली आहे आणि अमेझॉन वर OnePlus 6T साठी डेडिकेटेड पेज पण बनवण्यात आले आहे. 1 नोव्हेंबरला डिवाइस अमेझॉन इंडिया द्वारा सेल केला जाणार आहे आणि त्याआधी डिवाइस प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाला आहे. 

सेल मध्ये अमेझॉन वनप्लस 6T वर अनेक ऑफर्स देत आहे ज्यात रिलायंस जियो यूजर्स साठी Rs 5,400 चा कॅशबॅक, ICICI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड साठी Rs 2,000 चा इंस्टेंट डिस्काउंट यांचा ऑफर मध्ये समावेश आहे, तसेच जर तुम्ही सिटी बँक क्रेडिट कार्ड होल्डर असाल आणि तुम्ही हा डिवाइस 1 से 5 नोव्हेंबर दरम्यान विकत घेतला तर अमेझॉन पे बॅलेन्स च्या स्वरूपात Rs 1,000 पर्यंतचा कॅशबॅक पण तुम्हाला मिळवता येईल. 

OnePlus 6T अमेझॉन इंडिया व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच कंपनीच्या रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :