OnePlus 6T इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, वॉटरड्रॉप नॉच सह झाला लॉन्च

Updated on 30-Oct-2018
HIGHLIGHTS

OnePlus 6T कंपनी ने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, वॉटरड्रॉप नॉच आणि स्नॅपड्रॅगॉन 845 सह लॉन्च केला आहे.

अनेक दिवसांच्या लीक्स, टीजर्स आणि अफवांनंतर अखेरीस OnePlus 6T मोबाईल फोन अधिकृत रित्या लॉन्च झाला आहे. कंपनीने आपला हा फोन न्यू यॉर्क मध्ये आयोजित एका इवेंट मधून लॉन्च केला आहे आणि यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच यावेळी कंपनी ने डिवाइस मध्ये हेडफोन जॅकला जागा दिलेली नाही तसेच डिस्प्ले वरील नॉचचा आकार पण बदलण्यात आला आहे. मागील OnePlus 6 ला रेक्टेंगुलर नॉच देण्यात आली होती तर OnePlus 6T मध्ये वॉटरड्रॉप नॉच आहे. जी Oppo F9 Pro मधील नॉच प्रमाणे आहे. विशेष म्हणजे वनप्लस आणि Oppo दोन्ही ब्रँड्सची पॅरेण्ट कंपनी BBK आहे. 

OnePlus 6T स्पेसिफिकेशंस
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आहे आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI तेच. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस चे म्हणणे आहे कि या नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus चे म्हणणे आहे कि कंपनी ने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे. 

अपेक्षेप्रमाणेच OnePlus 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे तर डिवाइस दोन वेरिएंट्स 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज तसेच 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. हा LPDDR4X रॅम आणि UFS 2.1 2-लेन स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन लेटेस्ट ऑक्सीजन OS वर लॉन्च करण्यात आला आहे जो एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. नवीन OS अनेक सुधार आणि नवीन फीचर्स सह येतो ज्यात अपडेट झालेला गेमिंग मोड आणि स्मार्ट बूस्ट इत्यादींचा समावेश आहे ज्यामुळे ऍप स्टार्ट अप टाइम 5-20 टक्क्यांनी वाढला आहे. 

OnePlus 6T कॅमेरा
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर OnePlus 6T मध्ये मागील OnePlus 6 प्रमाणे सारखाच कॅमेरा सेटअप आहे. डिवाइसच्या रियर वर 16 आणि 20 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जे क्रमश: Sony IMX 519 आणि Sony IMX 376K सेंसर्स आहेत. 16MP च्या प्राइमरी कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.7 आहे आणि हा 1.22µm पिक्सल साइज सह येतो तर दुसरा 20 मेगापिक्सलचा सेंसर f/1.7 अपर्चर आणि 1.0µm पिक्सल साइज सह येतो. 

फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 16 मेगापिक्सलच्या Sony IMX 371 सेंसर सह येतो ज्याचे अपर्चर f/2.0 आहे आणि हा EIS व 1.0µm पिक्सल साइज सह येतो. OnePlus 6 प्रमाणे OnePlus 6T मध्ये पण फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन नॉच हाईड करता येते. OnePlus 6T मध्ये 3700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

OnePlus 6T ची किंमत 
OnePlus 6T चा 6GB+128GB वेरीएंट $549 (Rs 40,277 च्या आसपास) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर डिवाइसचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट $578 (Rs 42,400 च्या आसपास) मध्ये सादर करण्यात आला आहे आणि 8GB+256GB मॉडेल बद्दल बोलायचे तर डिवाइसची किंमत $629 (Rs 46,100 च्या आसपास) ठेवण्यात आली आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :