ट्रिपल कॅमेरा आणि 5G डाटा कनेक्टिविटी सह लॉन्च होऊ शकतो OnePlus 6T स्मार्टफोन
सध्या Huawei P20 Pro जगातील एकमेव स्मार्टफोन आहे जो ट्रिपल रियर कॅमेरा देत आहे.
OnePlus 6T could Arrive with Tri-Camera and 5G Data Connectivity: OnePlus 6 लॉन्च होऊन काहीच दिवस झाले आहेत इतक्यात OnePlus 6T बद्दल पण रुमर्स यायला सुरवात झाली आहे. अंदाज लावला जात आहे की OnePlus 6T ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येईल.
हि माहिती तर आधीच समोर आली होती की OnePlus 6T स्मार्टफोन 5G डाटा कनेक्टिविटी सह येईल पण आता ट्रिपल कॅमेरा असल्याच्या रुमर्स मुळे एका नवीन बदलाची शक्यता दिसत आहे. जर ट्रिपल कॅमेरा असलेल्या Huawei P20 Pro च्या किंमती शी तुलना केली तर OnePlus 6 ची किंमत या डिवाइस पेक्षा खुप कमी आहे.
DxOMark एक इमेज क्वालिटी रँकिंग आणि रिफरेन्स वेबसाइट आहे जिचा स्कोर मिळवणे कॅमेरा साठी एक मोठा फायदा आहे. यावर्षी मार्च मध्ये Huawei P20 Pro ला DxOMark वेबसाइट वर 109 गुण मिळाले होते जो आता पर्यंतचा सर्वात जास्त स्कोर होता.
हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो ट्रिपल रियर कॅमेरा सह सादर करण्यात आला होता आणि तिन्ही कॅमेरा वर्टिकली ठेवण्यात आले होते. रुमर्स येत आहेत की OnePlus 6T मध्ये मेन कॅमेरा म्हणून एक पॉप-अप कॅमेरा आणि डुअल रियर कॅमेरा असेल तर फ्रंट ला एक पॉप-अप स्लाइडर मध्ये दुसरा कॅमेरा दिला जाईल. नवीन लीक्स नुसार स्लाइडिंग मेकॅनिज्म Oppo Find X सारखाच वाटतो पण लीक झालेल्या फोटो वरून समजते की स्लाइडर Find X प्रमाणे छोटा नाही.
OnePlus 6T यावर्षीच्या शेवटच्या महिन्यांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि असे झाले तर OnePlus 6T जगातील दुसरा असा फोन असेल जो ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येईल आणि हा DxOMark लिस्ट मध्ये हाई रँक वर येऊ शकतो.
रुमर्ड स्पेसिफिकेशन्स
रुमर्स नुसार, OnePlus 6T मध्ये बेजल-लेस डिस्प्ले असेल आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 95% असेल आणि याला थोडी कर्व्ड बॉडी डिजाइन दिली जाईल आणि फ्रंट ला कोणत्याही फ्रेम्स नसतील. डिवाइस मध्ये राउंडेड डिस्प्ले आणि स्क्रीन च्या आताच फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. तसेच डिवाइस मध्ये 3D फेस रेकोग्निशन, 5G कनेक्टिविटी सह येईल आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट, 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असेल.
OnePlus 6T च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही, पण असे म्हणू शकतो की ट्रिपल कॅमेरा OnePlus 6 च्या डुअल कॅमेरा पेक्षा अधिक क्रिस्पर फोटो क्लिक करेल. Huawei P20 Pro बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 40MP+20MP+8MP चे सेंसर्स आहेत.
किंमत आणि उपलब्धता
OnePlus 6T भारतात यावर्षी नोव्हेंबर मध्ये लॉन्च होऊ शकतो. OnePlus 3T आणि OnePlus 5T पण भारतात नोव्हेंबर मध्ये लॉन्च करण्यात आले होते. OnePlus 6T 36,000 रुपयांपासून 52,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. OnePlus 6 च्या स्टॅण्डर्ड वेरिएंट ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू आहे.
नोट: फीचर्ड इमेज OnePlus 6 ची आहे.