OnePlus 6 स्मार्टफोन मध्ये अॅडवांस फुल स्क्रीन जेस्चर असू शकतात
OnePlus ने OnePlus 5T साठी एंड्राइड ओरियो ओपन बीटा 3 अपडेट च्या माध्यमातून जेस्चर सपोर्ट सादर केला आहे.
काही दिवसांपासुन OnePlus च्या आगामी फ्लॅगशिप डिवाइस OnePlus 6 बद्दल रुमर्स येत आहेत आणि कंपनी ने काही दिवसांपूर्वी OnePlus 6 चा टीजर पण पोस्ट केला होता. असे वाटत आहे की कंपनी लवकरच हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करेल. OnePlus च्या इटालियन फेसबुक पेज वर एक शोर्ट वीडियो टीजर रिलीज केला गेला होता ज्यावरून हे समोर येत आहे की हा डिवाइस फुल स्क्रीन जेस्चर सपोर्ट सह लॉन्च होईल.
OnePlus ने OnePlus 5T साठी एंड्राइड ओरियो ओपन बीटा 3 अपडेट च्या माध्यमातून जेस्चर सपोर्ट सादर केला आहे. तसेच नवीन टीजर ची टॅगलाईन “स्पीड अप विद जेस्चर” पाहता असे वाटते की OnePlus 6 प्रीलोडेड फुल स्क्रीन गेस्चर सपोर्ट सह येईल. या शोर्ट वीडियो वरून संकेत मिळत आहेत की OnePlus 6 यूजर्स ऑनस्क्रीन स्वाइपिंग अॅक्शन्स चा वापर करू शकतील. पण टीजर मध्ये गेस्चर च्या संपुर्ण फंक्शंस बद्दल जास्त काही माहिती मिळत नाही.
OnePlus 5T ला ओपन बीटा मुळे मिळालेल्या गेस्चर अपडेट पाहिले असता OnePlus 6 तीन प्रकारचे गेस्चर्स ऑफर करेल. स्क्रीन च्या सेंटर मधून वरच्या बाजूस स्वाइप करून यूजर्स होमस्क्रीन अॅक्सेस करू शकतील आणि डावीकडे स्वाइप करून बॅक फंक्शन अॅक्सेस करू शकतील. मल्टी-टास्किंग मेनू बघण्यासाठी यूजर्सना स्वाइप-अप आणि होल्ड जेस्चर चा वापर करावा लागेल. असे पण होऊ शकते की OnePlus 6 मध्ये कन्वेंशनल नेविगेशन बार ऐवजी फुल स्क्रीन जेस्चर फीचर असेल.
आशा आहे की OnePlus 6 मध्ये एक मोठा डिस्प्ले असेल जो हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येऊ शकतो आणि या डिवाइस वर ऑनस्क्रीन जेस्चर एक उत्तम नेविगेशन चा अनुभव देईल. OnePlus 6 मध्ये notch पण असेल पण कंपनी ने हे स्पष्ट केले आहे की याला लपवले जाऊ शकते. OnePlus 6 बद्दल अधिकृतपणे समोर आले आहे की या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. कंपनी चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.