OnePlus 6 स्मार्टफोन 17 मे ला चीन मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च, इंटरनेट वर आली माहिती

Updated on 25-Apr-2018
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी समोर आले होते की कंपनी आपला OnePlus 6 डिवाइस 21 मे ला लॉन्च करणार आहे, पण आता नवीन माहितीनुसार हा 17 मे ला लॉन्च होईल.

आम्ही तुम्हाला सांगितले होते की Oneplus 6 स्मार्टफोन 21 मे ला लॉन्च केलाय जाईल, पण आता कंपनी कडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार कंपनी आपला हा फ्लॅगशिप फोन 17 मे ला लॉन्च करू शकते. 

याआधी आलेल्या माहितीनुसार कंपनी ने एक OnePlus LAB प्रोग्राम ची सुरवात केली आहे, त्यातून कंपनी हा डिवाइस लॉन्च च्या आधी काही निवडक लोकांना हा टेस्ट करायाला देणार आहे. या प्रोग्राम बद्दल टेलिकॉमटॉक सांगत आहे की gsmarena च्या यूजर ने नोंदणी केली होती, ज्यात कंपनी ने या व्यक्ति ला फोन चे डिटेल्स पाठवले आहेत. या मेल मध्ये प्रोग्राम बद्दल टर्म्स आणि कंडीशन पण दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर या मेल मध्ये फोन च्या लॉन्च को बद्दल पण माहिती दिली आहे, ज्यानुसार हा डिवाइस 21 मे ला लॉन्च केला जाईल. 
डिवाइस लॉन्च ची ही तारीख पाहून हा वेळ खुप जास्त वाटतो कारण कंपनी ने काही दिवसांपूर्वी हा डिवाइस टीज करणे सुरू केले आहे. आधी आलेल्या काही लीक्स वर विश्वास ठेवला तर हा डिवाइस मे च्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. जर असे झाले तर कंपनी कडून मे मध्ये हा पहिला डिवाइस लॉन्च केला जाईल. पण जर कंपनी ची परंपरा पाहिली तर असे बोलू शकतो की कंपनी आपले फोंस जून च्या शेवटी लॉन्च करते. 
आता हे बघावे लागेल की जर हा डिवाइस 17 मे ला ग्लोबली लॉन्च केला गेला तर भारतात हा डिवाइस येण्यासाठी त्या नंतर एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागेल. याचा अर्थ असा की हा भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. तुम्ही जर याची वाट बघत असाल तर तुम्हाला अजून थोडी वाट बघावी लागेल. 
आधी आलेल्या काही लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा डिवाइस 5 मे ला लॉन्च केला जाऊ शकतो, त्यानंतर समोर आले की हा 16 मे ला लॉन्च केला जाऊ शकतो आणि आता असे समोर येत आहे की हा डिवाइस 21 मे ला लॉन्च केला जाईल. त्यातच या नव्या माहितीनुसार हा डिवाइस कंपनी 17 मे ला लॉन्च करेल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :