OnePlus 6 Fast AF (Fast and First) अमेजॉन इंडिया वर आता लाइव झाला आहे. या सेलचा उद्देश हा आहे की ज्या यूजर्सना हा स्मार्टफोन हवा आहे त्यांना हा मिळवा तसेच सर्वात आधी तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घेण्याची संधी दिली जात आहे. समर सेलचा एक भाग असल्यामुळे हा डिवाइस या सेल मध्ये विकला जाणार आहे, या सेल मध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन ई-गिफ्ट कार्ड वाउचर सह मिळेल, ज्याची किंमत Rs 1,000 आहे, हा सेल 13 मे पासून 16 मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या ऑफर अंतर्गत जर तुम्ही हा स्मार्टफोन या सेल मध्ये प्री-बुक केलात तर तुम्हाला हा डिवाइस विकत घेताना Rs 1,000 चा कॅशबॅक मिळणार आहे. अमेजॉन इंडिया वर हा डिवाइस विकत घेतल्यावर तुम्हाला Rs 1,000 चा कॅशबॅक अमेजॉन पे बॅलेंस च्या रुपात देण्यात येईल. त्याचबरोबर हा डिवाइस तुम्हाला तीन महिन्यांच्या एक्सटेंडेड वारंटी सह मिळेल. ज्यांना हा स्मार्टफोन 21 मे ला विकत घ्यायचा आहे, किंवा त्यानंतर 22 मे ला होणार्या याच्या रेगुलर सेल मध्ये विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा विकत घेऊ शकता.
या ऑफर चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अमेजॉन इंडिया वर या पेज वर जावे लागेल, पेज वर पोचल्यावर तुम्हाला शॉप नाऊ वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला Rs 1,000 च्या गिफ्ट कार्ड चा पर्याय निवडायचा आहे. मग तुम्ही हा स्मार्टफोन 16 मे च्या आधी विकत घेण्यास पात्र ठरू शकता. तुम्हाला गिफ्ट कार्ड मिळताच, तुम्ही ते याच्या सेल च्या वेळी वापरू शकता आणि विकत घेऊ शकता.
या डिवाइस बद्दल आता पर्यंत खुप काही समोर आले आहे आणि या लीक्स इत्यादी वरून आम्हाला समजले आहे की या डिवाइस मध्ये अनेक चांगले फीचर्स असणार आहेत, चला जाणून घेऊया याच्या काही फीचर्स बद्दल. OnePlus 6 मध्ये 6.28 इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले असेल ज्याचे रेज्ल्यूशन 2280 x 1080 पिक्सल असेल. शक्यता आहे की नॉच असल्यामुळे डिस्प्ले 19:9 एस्पेक्ट रेश्यो ऑफर करेल. हँडसेट चे मेजरमेंट 155.7 x 75.35 x 7.75mm आणि वजन 179 ग्राम आहे.
OnePlus A6000 मध्ये 3,300mAh ची बॅटरी असेल आणि हा डिवाइस 2.45 GHz ओक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. हा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असण्याची शक्यता आहे. TENAA लिस्टिंग वरून सध्या फक्त 6 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज खुलासा झाला आहे. असे होऊ शकते की TENAA लिस्टिंगला 8 GB रॅम, 128 GB आणि 256 GB स्टोरेज विकल्पां सह नंतर अपडेट करण्यात येईल. हँडसेट मध्ये एंड्राइड 8.1 ओरियो प्री-इंस्टोल्ड आहे. ऑप्टिक्स पाहता OnePlus 6 मध्ये 20 आणि 16 मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल आणि सेल्फी साठी हा डिवाइस 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सह येईल.