OnePlus 6 स्मार्टफोन च्या बाबतीत इंटरनेट वर खुप काही समोर आले आहे आणि याची भारतातील किंमत पण समोर आली आहे.
OnePlus आपला आगामी फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन म्हणजे OnePlus 6 लवकरच सादर करू शकते. जसा जसा या स्मार्टफोन चा लॉन्च जवळ येत आहे, तसे तसे या बद्दल चे लीक आणि रुमर्स च्या इंटरनेट वर येण्याची संख्या पण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी True Tech च्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 6 स्मार्टफोन ची भारतातील सुरुवाती किंमत Rs 33,999 असू शकते.
तसेच याला तीन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त या लिस्ट मध्ये OnePlus के Bullet Wireless earphones दिसला आहे, पण याची किंमत अजून तरी समोर आलेली नाही. मागे काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की हे वायरलेस एयरफोंस OnePlus 6 स्मार्टफोन सोबतच लॉन्च केले जाऊ शकतात.
जरी याची भारतातील किंमत समोर आली असली तर या लीक च्या डाटाबेस वरून हे समोर येत आहे की ही माहिती 29 मार्च 2018 पर्यंत पेंडिंग ठेवण्यात आली होती. याचा अर्थ असा की याची खरी किंमत अजूनही पडद्याआड आहे.
पण याच्या तीन वेगवेगळ्या वेरिएंटस च्या लीक किंमती बद्दल बोलायचे झाले तर असे समोर येत आहे की याचा 64GB वेरिएंट कंपनी कडून भारतात Rs 33,999 पासून Rs 36,999 च्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो, तसेच याच्या 128GB वेरिएंट बद्दल बोलायचे झाले तर हा जवळपास Rs 38,999 पासून Rs 42,999 च्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच याच्या 256GB वेरिएंट बद्दल बोलायचे झाले तर हा एक प्रीमियम डिवाइस असणार आहे. हा Rs 44,999 पासून Rs 48,999 च्या किंमतीत येण्याची शक्यता आहे.
आशा केली जात आहे की OnePlus 6 मध्ये एक मोठा डिस्प्ले असेल जो हाय स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येऊ शकतो आणि या डिवाइस वर ऑनस्क्रीन जेस्चर एक उत्तम नेविगेशन चा अनुभव देतील. OnePlus 6 मध्ये notch असेल पण कंपनी ने स्पष्ट केले आहे की ही लपवता येऊ शकते. OnePlus 6 बद्दल अधिकृतपणे समोर आले आहे की या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. कंपनी चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.