OnePlus 6 स्मार्टफोन वेगवेगळ्या तीन वेरिएंट्स मध्ये यावर्षीच्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते. असेच काही रिपोर्ट्स आणि लीक इत्यादी मधुन समोर येत होते. आता समोर येत आहे की हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. पण अजून याच्या लॉन्च बद्दल योग्य आणि अचूक माहिती समोर आली नाही पण कंपनी ने या स्मार्टफोन चे काही फीचर्स घेऊन टीज करणे सुरू केले आहे. आता काही दिवसांपूर्वी समोर आले होते की या स्मार्टफोन मध्ये काही जेस्चर कन्ट्रोल सोबत अलर्ट स्लाइडर पण असू शकतो, असेच काही आपण iPhone X स्मार्टफोन मध्ये पाहिले आहे. या स्मार्टफोन च्या बाबतित आता काही नवीन माहिती समोर आली आहे.
नवीन माहिती वेइबो वर पोस्ट केली गेली आहे, या माहिती वरून समोर आले आहे की हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यात नॉच असण्याची शक्यता पण नकाराता येत नाही.
हे याआधी पण स्पष्ट झाले आहे की हा डिवाइस एका नॉच सह सादर केला जाणार आहे. कंपनी च्या को-फाउंडर ने पण या बद्दल माहिती दिली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी असे पण समोर आले होते की जर यूजर ला नॉच नको असेल तर तो ती हटवू शकतो.
आता काही दिवसांपुर्वी आलेल्या बातम्या वर लक्ष टाकल्यास या स्मार्टफोन च्या बाबतित याच्या लॉन्च च्या आधी भरपूर माहिती समोर आली आहे. असे समोर आले आहे की डिवाइस ला क्वालकॉम कडून त्यांचा लेटेस्ट प्रोसेसर म्हणजे स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.
फोन 8GB च्या रॅम व्यतिरिक्त 256GB च्या स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो. पण जसे की खुपदा समोर आले आहे की हा तीन वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
हे पाहता आपण असे बोलू शकतो की स्मार्टफोन 6GB/8GB रॅम सह 64GB/128GB आणि 256GB स्टोरेज सह लॉन्च. केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त याच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याबाबतीत पण इन्टरनेट वर काही समोर आले आहे. कंपनी या डिवाइस ची किंमत Rs 33,999 पासून Rs 48,999 पर्यंत ठेऊ शकते. पण ही काही अधिकृत माहिती नव्हे. त्यामुळे यावर विश्वास ठेवने कठीण आहे.