OnePlus 6 Midnight Black Variant Goes on Sale Today Via Amazon India at 43999: OnePlus 6 स्मार्टफोन तिन वेगवेगळ्या स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा डिवाइस 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंट्स मध्ये घेता येतो. सर्वात मोठा स्टोरेज वेरिएंट मार्वल अवेंजेर्स लिमिटेड एडिशन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण त्यानंतर कंपनी ने काही दिवसांपूर्वी याचा एक अन्य वेरिएंट मिडनाइट ब्लॅक पण याच स्टोरेज म्हणजे 256GB सह लॉन्च केला आहे. आज या डिवाइस चा सेल अमेजॉन इंडिया च्या माध्यमातून होणार आहे. हा डिवाइस आज होणार्या सेल मधून विकत घेता येईल.
या डिवाइस ची किंमत Rs 43,999 आहे, आणि मार्वल च्या स्पेशल एडिशन बद्दल बोलायचे झाले तर त्यापेक्षा याची किंमत जवळपास Rs 1,000 ने कमी आहे. त्या डिवाइस ची किंमत Rs 44,999 आहे. पण जर 128GB वेरिएंट पाहिला असता याची किंमत त्यापेक्षा Rs 4,000 जास्त आहे, या स्टोरेज वेरिएंट ची किंमत Rs 39,999 आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे.
इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. OnePlus 6 एंड्राइड ओरियो वर आधारित कंपनी च्या ऑक्सीजन OS वर चालतो.