OnePlus 6 Midnight Black स्मार्टफोन भारतात 10 जुलै ला सेल साठी होईल उपलब्ध, किंमत आहे Rs 43,999

Updated on 28-Jun-2018
HIGHLIGHTS

OnePlus 6 चा हा नवीन नवीन मिडनाइट ब्लॅक स्मार्टफोन 8GB च्या रॅम सह 256GB स्टोरेज सह येईल, अजूनतरी फक्त एवेंजर्स एडिशन मध्ये तुम्हाला 256GB स्टोरेज मिळत होती.

OnePlus 6 Midnight Black goes on sale in India on July 10 at Rs 43,999: जर तुम्ही OnePlus 6 स्मार्टफोन चा 256GB स्टोरेज वेरिएंट विकत घेऊ इच्छित असाल, पण तुम्हाला एवेंजर्स एडिशन नको आहे तर असे करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही कारण कंपनी चा हा स्मार्टफोन एका नवीन मिडनाइट ब्लॅक वेरिएंट मध्ये 10 जुलै ला भारतात सेल साठी येणार आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 256GB ची स्टोरेज मिळणार आहे. या सोबत या डिवाइस मध्ये तुम्हाला 8GB चा रॅम पण मिळत आहे. 

हा डिवाइस Rs 43,999 च्या किंमतीत भारतात सेल साठी येईल. विशेष म्हणजे अमेजॉन इंडिया वर “नोटिफाई मी” पेज पण लाइव झाला आहे. तुम्ही इथे जाऊन या डिवाइस साठी री-रजिस्टर पण करू शकता. तुमची इथे नोंदणी केल्यानंतर हा डिवाइस सेल साठी येताच, तुम्हाला नोटिफाई करण्यात येईल.  

OnePlus 6 स्मार्टफोन चा 256GB मिडनाइट ब्लॅक वेरिएंट 10 जुलै ला अमेजॉन इंडिया वरून सेल साठी येईल, तसेच हा OnePlus.in च्या माध्यमातून 14 जुलै ला उपलब्ध केला जाणार आहे. त्याचबरोबर हा डिवाइस याच दिवशी OnePlus च्या ऑफलाइन चॅनल्स च्या माध्यमातून पण उपलब्ध होणार आहे. 

OnePlus 6 च्या स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हि एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सेल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सेल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस च्या रेडियो ट्रांसमिशन ला वाढवते आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळतो जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. 

इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. OnePlus 6 एंड्राइड ओरियो वर आधारित कंपनी च्या ऑक्सीजन OS वर चालत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :