OnePlus 6 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये दिसला iPhone X सारखा नॉच आणि वर्टिकल डुअल रियर कॅमेरा

Updated on 01-Mar-2018
HIGHLIGHTS

लीक झालेल्या फोटो वरून कळते की iPhone X प्रमाणे या डिवाइस च्या डिस्प्ले च्या टॉप वर नॉच असेल आणि रियर पॅनल वर वर्टिकल डुअल कॅमेरा सेटअप असेल.

वनप्लस च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन चे पाहिले फोटो ऑनलाइन दिसले आहेत. जर ITHome च्या Slashleaks ने शेयर केलेल्या या फोटो वर विश्वास ठेवला तर OnePlus 6 मध्ये काही महत्वपूर्ण बदल होतील आणि याच्या डिस्प्ले वर iPhone-X प्रमाणे नॉच आणि ग्लास रियर पॅनल असेल. हा नॉच फ्रंट फेसिंग कॅमेरा, इअरपीस आणि सेंसर्स साठी असेल आणि हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो सह लेटेस्ट ऑक्सीजन OS 5.1 वर काम करताना दिसत आहे जो आताच्या OnePlus 5T मध्ये नाही आहे. 

स्मार्टफोन च्या रियर पॅनल च्या फोटो ने वर्टिकल डुअल रियर कॅमेरा सेटअप चा खुलासा होत आहे. कॅमेरा सेटअप च्या खालोखाल एक LED फ्लॅश आणि चौकोनी फिंगरप्रिंट सेंसर पण आहे, जसा आपण Samsung Galaxy S9 स्मार्टफोंस मध्ये पहिला होता. हा डिवाइस 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह येईल असे वाटत आहे आणि आशा आहे की यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC असेल. 
लक्षात घेण्याची बाब म्हणजे कंपनी ने आपला OnePlus 5 स्मार्टफोन मागच्या वर्षी जून मध्ये सादर केला होता आणि हीच परंपरा चालू ठेवत कंपनी आपला पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन यावर्षी पण त्याच वेळेस लॉन्च करू शकते. पण हा लवकर आलेला पहिला लीक आहे त्यामुळे याला पूर्णपणे खर मानू शकत नाही. 
वनप्लस चे CEO Pete Lau ने स्पष्ट केले होते की कंपनी पुढील फ्लॅगशिप डिवाइस 2018 च्या दुसर्‍या सहामाहीत लॉन्च करेल. त्यांनी हे पण सांगितले होते की नवीन फ्लॅगशिप डिवाइस लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC वर चालेल कारण “ईतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही.”
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :