Oneplus 6 get OxygenOS 5.1.9 latest Update with July Security Patch: OnePlus 6 स्मार्टफोन ला मिळालेल्या नवीन OTA अपडेट मुळे याला एक नवीन स्वरूप मिळाले आहे, याच्या कॅमेरा पासून इतर अनेक बाबींमध्ये भरपूर बदल झाले आहेत. कंपनी ने आपल्या या डिवाइस ला OxygenOS 5.1.9 चा अपडेट दिला आहे. हा नवीन अपडेट एका OTA च्या माध्यमातून स्टॉक सॉफ्टवेयर वर OnePlus च्या यूजर्स साठी देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हा सर्व OnePlus 6 यूजर्सना मिळणार आहे. या अपडेट ची साइज 342MB आहे, यातील महत्त्वाची बाब म्हणजे हा जुलै च्या सिक्यूरिटी पॅच सह आला आहे.
या नवीन अपडेट मुळे कॅमेरा मध्ये भरपूर बदल दिसू शकतात, त्याचबरोबर कंपनी ने आपल्या अल्गोरिद्म मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याचे फोटो आता तुम्हाला वेगळे दिसतील. तसेच याच्या फ्रंट कॅमेरा पाहता, एक ब्यूटी मोड जो सेल्फी पोर्ट्रेट शॉट्स साठी आहे, या अपडेट मधून या फोन मध्ये देण्यात आला आहे.
त्याचबरोबर एक मोठा बदल असा पण समोर आला आहे की कंपनी ने फ्रंट कॅमेरा मध्ये गूगल लेंस मोड पण नेटिव कॅमेरा अॅप मध्ये दिला आहे. याचा अर्थ असा की आता तुम्ही यातून म्हणजे फोनच्या कॅमेरा मधून तुम्ही वस्तू सहज डिटेक्ट करू शकता. हा सपोर्ट काही दिवसांपूर्वी OnePlus 5 आणि OnePlus 5T स्मार्टफोन ला पण एक ओपन बीटा च्या माध्यमातून दिला आहे.
तसेच याव्यतिरिक्त पण अनेक बदल यात दिसू शकतात, जसे की एंड्राइड च्या सिक्यूरिटी पॅच सोबत फोन मधील काही जेस्चर्स पण फिक्स करण्यात आले आहेत. वाई-फाई स्टेबिलिटी पण ऑप्टिमाइज करण्यात आली आहे, तसेच ब्लूटूथ इत्यादी मध्ये पण बदल होऊ शकतात. त्याचबरोबर अनेक बग फिक्स पण या अपडेट च्या माध्यमातून झाले आहेत.