OnePlus 6 च्या कवर वरून डिवाइस च्या डिजाइन चा झाला खुलासा
यावेळी डिवाइस च्या कवर वरून डिजाइन चा खुलासा झाला आहे आणि ही डिजाइन आधीच्या लीक्स मध्ये सांगितल्या प्रमाणे आहे.
OnePlus आपला OnePlus 6 स्मार्टफोन लॉन्च करत आहे, हा कंपनीचा आता पर्यंतचा बेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. डिवाइस बद्दल सर्व डिटेल्स समजले आहेत, लॉन्च च्या वेळी फक्त किंमतीचा खुलासा होणे बाकी आहे. आता पुन्हा एकदा डिजाइनचा खुलासा करणारा नवीन लीक समोर आला आहे, यावेळी डिवाइस च्या कवर वरून डिजाइन चा खुलासा झाला आहे आणि ही डिजाइन आधीच्या लीक्स मध्ये सांगितल्या प्रमाणे आहे.
लीक वरून झाला खुलासा
या लीक वरून वर्टिकल कॅमेरा सेटअप आणि बॉटमला 3.5mm हेडडफोन जॅक ची माहिती मिळाली आहे. डिवाइसच्या बॅकला वर्टिकली डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि कॅमेरा सेटअप खाली एक LED फ्लॅश आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेंसर च्या खाली कंपनी चा लोगो आहे.
आधीच्या लीक वरून मिळालेली माहिती
कंपनी ने आधीच OnePlus 6 मध्ये हेडफोन जॅक असल्याचे स्पष्ट केले आहे. डिवाइस ची बॉटम डिजाइन मागील OnePlus 5T प्रमाणे आहे. त्याचबरोबर OnePlus 6 च्या टॉपला नॉच असेल आणि या डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. एका टीजर वरून हे पण समजले आहे की हा फ्लॅगशिप डिवाइस वॉटरप्रुफ पण असेल. डिवाइस मध्ये ग्लास बॅक आहे त्यामुळे अंदाज लावला जातोय की डिवाइस वायरलेस चार्जिंग फीचर ला सपोर्ट करेल पण या कंपनी ने आता पर्यंत या फीचर बद्दल माहिती दिली नाही.
लॉन्च ची तारीख
OnePlus 6 16 मे ला लंडन मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च केला जाईल आणि त्या नंतर दुसर्याच दिवशी म्हणजे 17 मे ला भारत आणि चीन मध्ये हा फ्लॅगशिप डिवाइस लॉन्च केला जाईल.