OnePlus 6 स्मार्टफोन च्या बाबतीत समोर आला सर्वात मोठा खुलासा, अशी असेल याची डिजाईन
OnePlus 6 स्मार्टफोन बद्दल एका केस मेकर ने खुप काही सांगितले आहे. या स्मार्टफोन ची डिजाईन समोर आली आहे. पण याच्या लॉन्च पर्यंत याबद्दल बोलणे थोडे घाईचे ठरेल.
जसे की तुम्ही पाहिले असेल की OnePlus ने आपल्या नवीन स्मार्टफोन च्या लॉन्च साठी टीजर कँपेन जारी केली आहे, कंपनी कडून या स्मार्टफोन बद्दल खुप काही समोर आले आहे. तसेच आता एका केस मेकर ने याची डिजाईन पूर्णपणे समोर आणली आहे. तुम्ही या स्मार्टफोन ची डिजाईन खुप जवळून या लीक मध्ये बघू शकता. ही माहिती केस मेकर Olixar यांच्याकडून आली आहे.
हे सर्व केस तुम्ही मोबाईलफन च्या माध्यमातून प्री-आर्डर करू शकता आणि याची किंमत पाहता जवळपास 7.49 डॉलर आहे. ही यांची सुरवाती किंमत आहे. या लीक मध्ये स्मार्टफोन च्या डिस्प्ले वर एक नॉच दिसत आहे. तसेच तुम्ही याचा ड्यूल कॅमेरा सेटअप पण याच्या बॅक पॅनल वर बघू शकता. हा थोड्याफार प्रमाणात Oneplus 5t सारखा आहे.
त्याचप्रमाणे कॅमेरा च्या मधेच तुम्हाला याचा LED फ्लॅश पण दिसेल, तसेच या सेटअप च्या खाली याचा फिंगरप्रिंट सेंसर बघू शकता. पण हा खुप छोटा आहे आणि यावरुन सॅमसंग गॅलेक्सी S9 आणि गॅलेक्सी S9+ स्मार्टफोन ची आठवण येते.
शेवटी एवढच म्हणू शकतो की कंपनी लवकरच आपला हा नवीन फ्लॅगशिप किलर बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोन चे काही स्पेक्स पण आता पर्यंत समोर आले आहेत. तुम्ही याला क्वालकॉम च्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह बघू शकता. यासोबतच यात 8GB रॅम असण्याची शक्यता आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 256GB ची स्टोरेज मिळू शकते.
त्याचप्रमाणे काही लीक असे पण सांगत आहेत की डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.28-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच कॅमेरा पाहात असे बोलले जात आहे की यात एक 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असणार आहे आणि एक 3450mAh क्षमता असलेली बॅटरी याल पॉवर देईल. जर रियर ड्यूल कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो मिळण्याची शक्यता आहे.