तुम्हाला तर OnePlus 6 स्मार्टफोन बद्दल माहिती असेलच आणि लवकरच OnePlus 6T पण बाजारत येणार आहे. OnePlus 6 आपल्या बजेट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. OnePlus 6 ची भारतातील किंमत आपल्याला परवडू शकते, या डिवाइस ची किंमत OnePlus 5T इतकीच आहे. पण OnePlus 6 चा नवीन स्पेशल एडिशन साठी तुम्हाला जवळपास Rs 2.26 लाख मोजावे लागतील. तुम्हाला तर माहितीच असेल की OnePlus ने त्यांचा OnePlus 6 स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि सिल्क वाइट रंगात सादर केला होता, पण OnePlus 6 चा नवीन वर्जन लक्झरी फ्रेंच ब्रँड Hadoro Paris ने कस्टमाइज केला आहे आणि त्यामुळे OnePlus 6 च्या या स्पेशल एडिशन ची किंमत जवळपास Rs 2.26 लाख झाली आहे. याचा अर्थ असा की आता तुम्ही OnePlus 6 चा स्पेशल एडिशन जवळपास Rs 2.26 लाख मध्ये घेऊ शकाल. OnePlus 6 च्या या नवीन स्पेशल एडिशनला OnePlus 6 Carbon असे नाव देण्यात आले आहे.
या डिवाइस ची सर्वात मोठी खासियत अशी की OnePlus आणि या फ्रेंच ब्रँड ने एकत्र येऊन एक ग्लोविंग OnePlus लोगो बॅक कवर वर मधोमध दिला आहे. हा लोगो स्क्रॅच प्रूफ सफायर ग्लास ने बनलेला आहे. या डिवाइसचा लुक खुप आकर्षक आहे. तसेच याचे वजन साध्या OnePlus 6 डिवाइस पेक्षा खुप जास्त आहे. OnePlus 6 स्पेशल एडिशन तुम्ही 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट मध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर हा एका सिम-फ्री आणि अनलॉक वर्जन मध्ये घेता येईल.
OnePlus 6 ची भारतातील किंमत
हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करण्यात आला आहे, हा क्वालकॉम ने सादर केलेला त्यांचा सर्वात लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट आहे, जो इतर काही स्मार्टफोंस मध्ये दिसला आहे. डिवाइस मध्ये एड्रेनो 630 GPU पण आहे. फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइस च्या एका वेरिएंट मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे ज्याची किंमत 34,999 रूपये आहे, तर डिवाइस च्या दुसर्या वेरिएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे आणि याची किंमत 39,999 रूपये ठेवण्यात आली आहे.
OnePlus 6 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
या डिवाइस बद्दल समोर आलेले लीक आणि रुमर्स मधून आधीच खुप काही समजले आहे. पण तरीही सर्वांना याबद्दल उत्सुकता होती. फोन मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. ही एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस चे रेडियो ट्रांसमिशन वाढवतो आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन पण देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळत आहे जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे.
OnePlus 6 कॅमेरा
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे.
कॅमेरा एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी कंपनी ने काही सुधार केले आहेत, ज्यात हाई स्पीड कॅमेरा, मल्टीपल फ्रेम फोटो घेण्याची क्षमता आणि OIS यांचा समावेश आहे. OIS मुळे लो लाइट मध्ये फोटो घेता येतात. तसेच कॅमेरा अॅप मध्ये फास्ट पोर्ट्रेट मोड देण्यात आला आणि लवकरच डिवाइसला सेल्फी पोर्ट्रेट अपडेट पण मिळेल. त्याचबरोबर कॅमेरा 480fps वर HD स्लो मोशन विडियो रेकॉर्ड करू शकतो आणि या डिवाइस मध्ये स्लो मोशन विडियो ची वेळ मर्यादा वाढवण्यात आली आहे, आता तुम्ही 60 सेकंड्सचा स्लो मोशन विडियो कॅप्चर करू शकता.
इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. OnePlus 6 एंड्राइड ओरियो वर आधारित कंपनी च्या ऑक्सीजन OS वर चालत आहे.