OnePlus 6 आणि OnePlus 6T मोबाईल फोन्सना नवीन OxygenOS अपडेट देण्यात आला आहे, तसेच या मोबाईल फोनला मे महिन्याचा एंड्राइड सिक्यूरिटी पॅच पण देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात वनप्लस ने आपल्या OnePlus 6 आणि OnePlus 6T स्मार्टफोन्स साठी लेटेस्ट OxygenOS चा बीटा अपडेट जारी केला होता. या अपडेट मध्ये तुम्हाला झेन मोड आणि स्क्रीन रेकॉर्डर पण मिळणार आहे. पण आता असे समोर येत आहे कि कंपनीने तिच्या 2018 च्या फ्लॅगशिप फोन्स साठी नवीन अपडेट जारी केला आहे.
OnePlus 6 मोबाईल फोनला OxygenOS 9.0.6 चा अपडेट देण्यात आला आहे, तसेच OnePlus 6T मोबाईल फोन ला 9.0.14 चा अपडेट देण्यात आला आहे. या दोन्ही फोन्स मध्ये या अपडेट मध्ये खुप बदल केले गेले आहेत. तसेच जर OnePlus 6T मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला कॅमेर्यात काही बदल दिसतील.
OnePlus 6T Rs 37,999 मध्ये लॉन्च केला गेला होता. अमेजॉन वर डिवाइसच्या किंमतीत Rs 3,000 कपात झाल्यानंतर हा Rs 34,999 मध्ये सेल केला जात आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत Rs 4,000 नी कमी झाल्यानंतर हा Rs 37,999 मध्ये विकत घेता येईल तर 8GB रॅम आणि 256GB वेरिएंट Rs 45,999 ऐवजी Rs 41,999 मध्ये मिळत आहे.
OnePlus 6T मध्ये 6.41 इंचाचा ऑप्टिक AMOLED 19.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन 2340 x 1080p पिक्सल आणि याची पिक्सल डेंसिटी 402 PPI आहे. स्क्रीनला नवीन कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि वनप्लस नुसार नवीन नॉच मुळे डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 86 टक्के होतो जो OnePlus 6 मध्ये 83.8 टक्के होता. OnePlus नुसार कंपनीने डिस्प्लेची ब्राइटनेस लेवल, कलर एक्यूरेसी आणि कलर रेंज सुधारण्यासाठी पण काम केले आहे. OnePlus 6T क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC द्वारा संचालित आहे आणि याचा क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे.