OnePlus ने फक्त 22 दिवसांमध्ये OnePlus 6 चे 10 लाख यूनिट्स विकले

Updated on 15-Jun-2018
HIGHLIGHTS

2013 नंतर OnePlus 6 कंपनी चा पहिला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन बनला आहे.

OnePlus 6 स्मार्टफोन चे फक्त 22 दिवसांमध्ये दिनों 10 लाख यूनिट्स विकले गेले आहेत. त्यामुळे 2013 नंतर हा कंपनीचा आता पर्यंतचा सर्वात वेगाने विकला जाणारा डिवाइस बनला आहे. 

फोन मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हि एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सेल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सेल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस च्या रेडियो ट्रांसमिशन ला वाढवते आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळतो जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे. 

हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करण्यात आला आहे, हा क्वालकॉम ने सादर केलेला त्यांचा सर्वात लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट आहे, जो इतर काही स्मार्टफोंस मध्ये दिसला आहे. डिवाइस मध्ये एड्रेनो 630 GPU पण आहे. फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइस च्या एका वेरिएंट मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे ज्याची किंमत 34,999 रूपये आहे, तर डिवाइस च्या दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे आणि याची किंमत 39,999 रूपये ठेवण्यात आली आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. 
इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :