OnePlus 5, OnePlus 5T स्मार्टफोनला मिळायला सुरवात झाली OxygenOS 5.1.3 चा अपडेट

Updated on 21-Jun-2018
HIGHLIGHTS

OnePlus 5 आणि OnePlus 5T च्या यूजर्सना एका नवीन अपडेट च्या रुपात OxygenOS 5.1.3 मिळणे सुरू झाले आहे.

Oneplus 5 and OnePlus 5T Smartphones Receive OxygenOS 5.1.3 Update: OnePlus 5 आणि OnePlus 5T च्या यूजर्सना एका नवीन अपडेट च्या रुपात OxygenOS 5.1.3 मिळणे सुरू झाले आहे. या आठवड्याच्या सुरवातीला कंपनी ने आपल्या OnePlus 6 स्मार्टफोन ला OxygenOS 5.1.8 चा नवीन सॉफ्टवेयर अपडेट दिला होता. या अपडेट नंतर भारतीय यूजर्सना पण ते सर्व नवीन फीचर्स मिळाले आहेत, जे त्यांना मिळणारा होते. कंपनी ने अपडेट च्या बाबतीत आपल्या जुन्या स्मार्टफोंस म्हणजे OnePlus 5 आणि OnePlus 5T स्मार्टफोन ला पण अपडेट दिला आहे. हा अपडेट OTA च्या माध्यामातून देण्यात आला आहे. 
स्मार्टफोन्सना मिळालेला हा अपडेट जवळपास 58MB चा आहे. जर तुम्हाला अजुनही हा अपडेट मिळाला नसेल तर तुम्हाला हा मॅनुअली जाऊन चेक करावा लागेल. यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन हा चेक करावा लागेल. विशेष म्हणजे या दोन्ही स्मार्टफोंसना काही दिवसांपूर्वी एंड्राइड Oreo चा पण अपडेट देण्यात आला होता. तसेच OnePlus 5T स्मार्टफोन आता अधिकृत रीत्या नेविगेशन जेस्चर ला पण सपोर्ट करत आहे, आता हा iPhone X प्रमाणे चालेल. 

जसे की तुम्हाला माहितीच आहे की जवळपास तिन महिने बीटा मध्ये ठेवल्यानंतर, तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन या जेस्चर ला इनेबल किंवा डिसएबल करू शकता. आता जर तुम्ही स्क्रीन वर मधुन स्वाइप केली तर तुम्ही होम वर जाल, तसेच बॉटम स्वाइप करताच तुम्ही रीसेंट अॅप्स वर पोहचाल. त्याचबरोबर आता तुम्ही लेफ्ट आणि राईट स्वाइप करून बॅक जाऊ शकता. 

जर तुम्हाला या जेस्चर बद्दल माहिती नसेल तर तुम्हाला परेशान होण्याची गरज नाही, जेव्हा तुम्ही हे टर्न ऑन कराल तेव्हा तुम्हाला एक टुटोरिअल दिसेल, जो तुम्हाला योग्य रित्या हे शिकवेल की हे कसे वापरायचे. 

हे लक्षात असू दे की जेस्चर फक्त OnePlus 5T स्मार्टफोन सोबत वापरता येतील. पण अजूनतरी आम्हाला याची माहिती नाही की हे oneplus 5 मध्ये पण देण्यात आले आहेत की नाही. पण आगामी काही दिवसांमध्ये या baddl माहिती तुमच्या समोर येऊ शकते आणि OnePlus 5 मध्ये पण तुम्हाला हा फीचर मिळू शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :