वनप्लसने युरोप आणि अमेरिकेतील शहरांमध्ये आपल्या ह्या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाणाविषयी माहिती देत आहे. मात्र आतापर्यंत भारतीय शहरांच्या संबंधी कोणतीही माहिती दिली गेली नाही.
वनप्लसने अशी घोषणा केली आहे की, जगातील सर्व शहरांमध्ये पॉप-अप इव्हेंटचे आयोजन करणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना वनप्लस 3 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर काही आकर्षक गिफ्ट्ससुद्धा मिळतील. भारतात हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई आणि बंगळूरुमध्ये आयोजित करेल. तर जागतिक स्तरावर हा न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि बर्लिन शहरात आयोजित केला जाईल. मात्र भारतीय शहरांसंबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.कंपनीने सांगितले आहे की, कोणीही ह्या कार्यक्रमाचा भाग बनू शकता, त्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज पडणार नाही.
कंपनीने ह्याआधीच सांगितले आहे की, वनप्लस 3 स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज पडणार नाही. सर्वात आधी लूप VR च्या माध्यमातून हा फोन खरेदी केला जाईल.
त्याशिवाय काही निवडक यूजर्सला कंपनीने वनप्लस 3 चा रिव्ह्यू करण्याची संधी दिली आहे. त्यासाठी यूजर्सला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपली माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर कंपनी त्यातील ३० लोकांना निवडेल.