वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड वेरियंट लवकरच भारतात मिळणे सुरु होईल. अलीकडेच वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पी यांनी ही घोषणा केली. तथापि, हा प्रकार कधीपर्यंत येईल ह्याविषयी अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. वनप्लस 3 चा आणखी एक फोन ग्रेफाइट रंगाचा जो मेटल बॉडीने बनलेला आहे. हा अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो.
रंगाशिवाय ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काही विशेष बदल नाही. सॉफ्ट गोल्ड आणि ग्रेफाइट रंगांशिवाय ह्यात कोणताही वेगळा बदल नाही.
वनप्लस 3 स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुरक्षित आहे.
हेदेखील पाहा – HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो.
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
हेदेखील वाचा – आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट