अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 27,999 रुपयात
वनप्लसने आपला वनप्लस 3 स्मार्टफोन ह्याच महिन्यात लाँच केला. ह्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने मागील स्मार्टफोनपेक्षा खूप नवीन बदल केेले आहेत. हे बदल डिझाईन आणि स्पेक्सच्या बाबतीत झाले आहेत. त्याशिवाय कंपनीने ह्या स्मार्टफोनचे ग्रेफाइट आणि सॉफ्ट गोल्ड रंगातील प्रकार लाँच केले आहेत. मात्र सध्यातरी ह्याला ग्रेफाइट रंगात लाँच केले गेले आहे. त्याशिवाय कंपनीचे सह संस्थापक carl Pei ने केलेल्या ट्विटमध्ये अशी माहिती दिली आहे की, सॉफ्ट गोल्ड वेरियंटला सध्यातरी लाँच केले जाणार नाही.
ह्या फोनचा रेड वेरियंट लवकरच येणार आहे. ह्या फोनला कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट केले आहे. त्यामुळे आता वनप्लस 3 स्मार्टफोन घेण्या-यांकडे आणखी एक चॉईस असणार आहे. तसेच ह्याचे अनेक रंगांचे वेरियंट लवकरच येणार आहेत. मात्र ह्याविषयी वनप्लस कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र हे स्मार्टफोन्स लवकरच येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, सध्यातरी ह्याचा ग्रेफाइट वेरियंट अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून २७,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ह्याला आपण कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता.
https://twitter.com/the_malignant/status/745274075900174336
वनप्लस 3 स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुरक्षित आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो.
हेदेखील वाचा – शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात खूप महत्त्वपुर्ण आहेत हे ७ आकर्षक लॅपटॉप्स
ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात NFC सपोर्ट, USB टाइप-C, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.