मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने अलीकडे आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस X भारतात लाँच केला होता. आता अशी माहिती मिळत आहे की, हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आज ओपन सेलमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर थोडाही विलंब न करता, त्वरित हा स्मार्टफोन खरेदी करावा. कारण हा ओपन सेल फक्त आजच्या दिवसापुरताच मर्यादित आहे. आज हा स्मार्टफोन घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात वनप्लस Xची तीन दिवसाचा ओपन सेल आयोजित केला होता. मात्र भारतात यूजर ह्या ऑफरचा फायदा फक्त आजचा दिवसच घेऊ शकतात. ह्या स्मार्टफोनचा ऑनिक्स प्रकार भारतात ऑक्टोबर महिन्यात १६,९९९ रुपयात लाँच केला होता.
वनप्लस Xच्या दोन्ही प्रकारांविषयी बोलायचे झाले तर, ग्लास व्हर्जन वनप्लस X ओनिक्स ब्लॅकग्लाससह लाँच झाला आहे, ह्याची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे आणि ह्याचे वजन १३८ ग्रॅम आहे. तर ह्याचा दुसरा व्हर्जन सेरामिकविषयी बोलायचे झाले तर, ह्यात जिर्कोनियाचा वापर केला गेला आहे आणि ह्याची किंमत २२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्याचे वजन १६० ग्रॅम आहे.