OnePlus 3 आणि OnePlus 3T ला मिळत आहे फेस अनलॉक फीचर

Updated on 29-May-2018
HIGHLIGHTS

हा अपडेट रीडिफाइन शेल्फ UI आणि अॅप्स शॉर्टकट साठी नवीन डिझाइन घेऊन येत आहे.

OnePlus आपल्या 2016 च्या OnePlus 3 आणि OnePlus 3T डिवाइस साठी अपडेट जारी करत आहे. या नवीन अपडेट मध्ये डिवाइस साठी नवीन फेस अनलॉक फीचर आणि मे चा सिक्योरिटी पॅच आहे. 
OnePlus 3 आणि OnePlus 3T साठी हा अपडेट OxygenOS 5.0.3 च्या रुपात येत आहे. यूजर्स OnePlus 5T सह सादर झालेल्या फेस अनलॉक फीचर साठी उत्साहित होते आणि नंतर हा अपडेट OnePlus 5 यूजर्स ना पण मिळाला. हे पण चांगली बाब आहे की सिक्योरिटी पॅच अपडेट केला जात आहे. शेवटचा सिक्योरिटी पॅच डिसेंबर 2017 मध्ये जारी झाला होता. हा अपडेट रीडिफाइन शेल्फ UI आणि अॅप्स शॉर्टकट साठी नवीन डिझाइन घेऊन येत आहे. तसेच गलरी अॅप, फाइल मॅनेजर आणि वेदर विजेट मध्ये पण नवीन फीचर्स येतील. 
OnePlus 3 बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर एड्रेनो 530 GPU सह आहे. या क्वाड कोर प्रोसेसर ची क्लॉक स्पीड 2.35GHz आहे. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 6GB च्या रॅम सह 64GB या 128GB इंटरनल स्टोरेज चे पर्याय मिळतात. या स्मार्टफोन मध्ये 16MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, हा एक सॅमसंग चा f/2.0 अपर्चर वाला सेंसर आहे. यात एक मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यात 3400mAh ची बॅटरी आहे जी डॅश चार्जिंग सपोर्ट सह येते.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :