आज सुद्धा ओपन सेलमध्ये मिळणार वनप्लस२ स्मार्टफोन

आज सुद्धा ओपन सेलमध्ये मिळणार वनप्लस२ स्मार्टफोन
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले (१९२०x१०८० पिक्सेल) रिझोल्युशनसह दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरसह ४ जीबी रॅमसुद्धा दिला गेला आहे.

वनप्लस२ स्मार्टफोनचे आजसुद्दा ओपन सेल केले जाणार असल्याची वनप्लस इंडियाने घोषणा केली आहे. सोमवारी दुपारी १२ ते १ दरम्यान कंपनीने अॅमेझॉन इंडिया वेबसाईटवर वनप्लस २स्मार्टफोनचे ओपन सेल केले होते. त्या सेलला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे आजसुद्दा हा ओपन सेल आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ह्या ओपन सेलला सुरुवात झाली आहे.

 

वनप्लस२ ला भारतात जुलै महिन्यात लाँच केले होते. ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ ठेवण्यात आलीय, जी ह्याच्या ६४जीबी मॉडेलची किंमत आहे. स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले (१९२०x१०८०p) रिझोल्युशनसह देण्यात आली आहे.  त्याचबरोबर ह्यात क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरसह ४जीबीची रॅमसुद्धा देण्यात आली आहे.

 

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल फ्लॅशसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर ह्या कॅमे-यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि ऑटो फोकससुद्धा दिला आहे. तसेच ह्यात f/2.0 अॅपर्चर आणि 4k व्हिडियो सपोर्टसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोन युएसबी टाईप-C सुद्धा आहे. त्याचबरोबर ह्या कंपनीचे म्हणणे आहे की, ह्याच्या हार्डवेअरमध्ये काही बदल केले गेले आहेत.  स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला एक स्लायडर बटण दिले गेले आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्याला सूचना प्राप्त होतील. तसेच ह्यात मुख्य बटण फिंगरप्रिंट सेंसरसह दिले गेले आहे. हे आपल्या पाच बोटांचे ठसे स्टोर करण्यात सक्षम आहेत.

हा एक ड्युल-सिम स्मार्टफोन आहे, जो आपल्याला LTE सपोर्टसह मिळतो. ह्या स्मार्टफोनमध्ये ३३००mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएसवर चालतो. मात्र कंपनीचे म्हणणे आहे की, हा प्लेन वॅनिला अॅनड्रॉईड ओएसवर आधारित नाही आणि काही बदल करुन आलेला आहे. रिमूव्हेबल काळ्या रंगाच्या कव्हरसोबत वनप्लस २ इतर चार मागील कव्हर्ससोबत आणला आहे, ज्यात बांबू, ब्लॅक अॅप्रिकॉट, रोजवूड आणि केवलर यांचा समावेश आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo