वनप्लस 2 चा 16GB चा प्रकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध

वनप्लस 2 चा 16GB चा प्रकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

वनप्लसने जुलै २०१५ मध्ये वनप्लस 2 स्मार्टफोन लाँच केला होता. परंतू ह्याच्या 64GB च्या प्रकारालाच २४,९९९ रुपयात सादर केले गेले होते. तथापि, कंपनीने आता अशी माहिती दिली आहे की, भविष्यात ह्या स्मार्टफोनला 16GB व्हर्जनसह सादर केले जाईल.

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने भारतात आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस 2 च्या 16GB च्या प्रकाराला सादर केले आहे. हा प्रकार एक्सक्लुसिव्हरित्या ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडियावर मिळेल. 64GB च्या प्रकाराप्रमाणे ह्याला खरेदी करण्यासाठी आता कोणत्याही निमंत्रणाची गरज पडणार नाही. वनप्लस 2च्या 16GB च्या प्रकाराची किंमत २२,९९९ रुपये आहे.

 

वनप्लसने जुलै २०१५ मध्ये वनप्लस 2 स्मार्टफोन लाँच केला होता. परंतू ह्याच्या 64GB च्या प्रकारालाच २४,९९९ रुपयात सादर केले गेले होते. तथापि, कंपनीने आता अशी माहिती दिली आहे की, भविष्यात ह्या स्मार्टफोनला 16GB व्हर्जनसह सादर केले जाईल.

16GB च्या ह्या प्रकारात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले (1920x1080p) रिझोल्युशनसह दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरसह 3GB रॅमसुद्धा दिली गेली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल फ्लॅशसह दिला आहे. त्याचबरोबर ह्या कॅमे-यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि ऑटो फोकससुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात f/2.0 अॅपर्चर आणि 4K व्हिडियो सुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये युएसबी टाइप-Cसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्याच्या हार्डवेअरमध्येही काही बदल केले गेले आहेत. स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला एक स्लायडर बटन दिले आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर होम बटन फिंगरप्रिंट सेंसरसह दिला गेला आहे. हा पाच फिंगरप्रिंट्सला स्टोर करण्यात सक्षम आहे.

हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो आपल्याला LTE सपोर्टसह मिळतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 3300mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएसवर चालतो.

हेदेखील वाचा – आता कोणत्याही निमंत्रणाशिवाय उपलब्ध होणार वनप्लस X स्मार्टफोन

हेदेखील वाचा – जिओनी E-लाइफ S8 स्मार्टफोन होणार २२ फेब्रुवारीला लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo