OnePlus 13 Launched: मागील काही काळापासून टेक विश्वात सर्वत्र फ्लॅगशिप किलर OnePlus च्या स्मार्टफोनची चर्चा सुरु आहे. अखेर आता कंपनीने OnePlus 13 चीनमध्ये लाँच आहे. हा फोन OnePlus 12 ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये सिल्क ग्लास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या डाव्या बाजूला तीन-स्टेज अलर्ट स्लाइडर आहे. चांगल्या गेमिंगसाठी 4D कंपन समर्थित आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 13 ची किंमत आणि इतर सर्व तपशील-
Also Read: Nothing ने लाँच केला अंधारात चमकणारा Unique स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स
OnePlus 13 फोन चार व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 53,150 रुपये आहे. तर, 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,899 युआन म्हणेजच सुमारे 57,875 रुपये आहे. त्याबरोबरच, 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5299 युआन म्हणजेच सुमारे 62,590 रुपये इतकी आहे. अखेर 24GB + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5999 युआन म्हणजेच सुमारे 70,860 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
OnePlus 13 या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा 2K प्लस LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी क्रिस्टल शील्ड सुपर सिरॅमिक ग्लासही बसवण्यात आला आहे. हा फोन Android 15 आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite octa-core प्रोसेसर देण्यात आहे. यात 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
OnePlus 13 मध्ये फेस अनलॉक आणि अल्ट्रा-सॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याला IP69 ची रेटिंग देखील मिळाली आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये Hasselblad द्वारे निर्मित 50MP Sony LYT-808 सेन्सर, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. OnePlus च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. यात 100w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट उपलब्ध आहे.