बहुप्रतीक्षित OnePlus 13 लवकरच होणार भारतात दाखल! फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वी Leak

Updated on 20-Sep-2024
HIGHLIGHTS

नवा स्मार्टफोन OnePlus 13 लवकरच भारतात होणार लाँच

लाँचपूर्वीच या फोनशी संबंधित अनेक माहिती इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

OnePlus 13 फोन तब्बल 100W वायर्ड चार्जिंगच्या सपोर्टसह येण्याची शक्यता

फ्लॅगशिप किलर OnePlus पुढील महिन्यात भारतात आपला नवीन फोन OnePlus 13 लाँच करणार, अशी माहिती मिळाली आहे. लाँचपूर्वीच या फोनशी संबंधित अनेक माहिती इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. फोनबद्दल अनेक लीक्स पुढे येत असताना अलीकडेच, OnePlus 13 RAM ची माहिती एका चिनी टिपस्टरने शेअर केली आहे. लीक्सनुसार, मोठ्या मेमरीसह आणि दमदार प्रोसेसरसह हा फोन लाँच करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. जाणून घेऊयात OnePlus 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: आगामी Vivo V40e फोनची लाँच तारीख जाहीर! Powerful फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल

OnePlus 13 बद्दल लीक्स

OnePlus 13 बद्दल चिनी टिपस्टर ‘डिजिटल चॅट स्टेशन’ द्वारे त्याच्या Weibo अकाउंटवरील पोस्टद्वारे शेअर केले. लीक माहितीनुसार, फोनमध्ये 24GB रॅम दिली जाऊ शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने 24GB रॅम पर्यायासह OnePlus 12 देखील सादर केला आहे. कंपनी हा वेरिएंट भारतात लॉन्च करेल की नाही, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. भारतात कंपनी हा फोन 16GB रॅम टॉप वेरिएंटसह लाँच करेल, अशी अपेक्षा आहे.

OnePlus 13 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, फोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह 6.82-इंच 10-बिट LTPO BOE X2 मायक्रो-कर्व्ड OLED डिस्प्ले मिळू शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 4 चिपसेटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. हा फोन Android 14 वर कार्य करेल, अशी अपेक्षा आहे. फोनला पाण्यापासून संरक्षणासाठी IP69 रेटिंग प्रोटेक्शन दिले जाऊ शकते.

OnePlus चे स्मार्टफोन्स फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आगामी फोनच्या कॅमेरा सेक्शनमध्ये काय विशेष असेल, यासाठी OnePlus चे चाहते उत्सुक आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, लीकनुसार, या फोनच्या मागील पॅनलवर, 50MP Sony LYT808 प्राथमिक कॅमेरा, 50MP LYT600 पेरिस्कोप कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान केला जाऊ शकतो. तर, पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 6000 किंवा 6100mAh बॅटरीसह ऑफर केला जाऊ शकतो. ही बॅटरी तब्बल 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :