आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 लाँच डेट जाहीर! ‘या’ दिवशी जागतिक बाजारात होणार जबरदस्त Entry 

आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 लाँच डेट जाहीर! ‘या’ दिवशी जागतिक बाजारात होणार जबरदस्त Entry 
HIGHLIGHTS

OnePlus च्या आगामी नंबर सिरीज OnePlus 13 च्या लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे.

अखेर आज या OnePlus 13 ची लाँच तारीख जाहीर झाली आहे.

OnePlus 13 हँडसेटमध्ये Hasselblad ने डिझाइन केलेला कॅमेरा सेटअप असेल.

फ्लॅगशिप किलर OnePlus च्या आगामी नंबर सिरीज OnePlus 13 च्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. OnePlus चे चाहते आतुरतेने या स्मार्टफोनची प्रतीक्षा करत आहेत. अखेर आज या OnePlus 13 ची लाँच तारीख जाहीर झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फ्लॅगशिप स्मार्टफोन या महिन्याच्या शेवटी OnePlus 12 ची अपग्रेडेड आवृत्ती म्हणून सादर केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 13 चे लॉंचिंग डिटेल्स-

Also Read: Best Offers! लोकप्रिय OnePlus 12 वर मोठ्या Discount सह Amazon वर उपलब्ध, मिळेल 50MP मेन कॅमेरा

OnePlus 13 ची लाँच डेट

स्मार्टफोन ब्रँड OnePlus नुसार OnePlus 13 सर्वप्रथम चीनमध्ये 31 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. यानंतर हे उपकरण भारतासह इतर देशांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. त्याच्या टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, हा ऑब्सिडियन ब्लॅक, ब्लू मोमेंट आणि व्हाइट ड्यू या फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. अनेक टीपस्टरने आपल्या अधिकृत X अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे.

अलीकडील लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार, जर OnePlus 13 भारतात आला तर त्याची किंमत 70 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते, असा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि लीकनुसार, आगामी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर प्रदान केला जाईल. या हँडसेटमध्ये Hasselblad ने डिझाइन केलेला कॅमेरा सेटअप असेल. तसेच, फोनमध्ये जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी शक्तिशाली बॅटरी देखील दिली जाईल.

OnePlus 13 चे लीक तपशील

oneplus 13 launch date

लीकनुसार, OnePlus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन जगातील पहिला सेकंड-जेन 2K BOE X2 वक्र स्क्रीनसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Elite (8 Gen 4) चिप दिली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी, OnePlus 13 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात पहिला 50MP LYT808 सेन्सर, दुसरा 50MP JN5 आणि तिसरा LYT600 3X पेरिस्कोप सेन्सर मिळू शकते. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी असण्याची शक्यता आहे. तसेच, यात 100W वायर फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo