Google Pixel 8a Vs OnePlus 12R: मिड रेंजमध्ये कोणता फोन बेस्ट? बघा टॉप 5 Powerful फीचर्स। Tech News
Google Pixel 8a ची त्याच्याच समान किंमत श्रेणीत येणाऱ्या OnePlus 12R शी तुलना
Google Pixel 8a स्मार्टफोन अनेक अपग्रेडसह लाँच करण्यात आला आहे.
OnePlus 12R ला व्हॅल्यू फॉर मनी डिवाइस म्हटले जाऊ शकते.
अलीकडेच Google Pixel 8a स्मार्टफोन अनेक अपग्रेडसह सादर करण्यात आला आहे. याशिवाय या फोनला मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन प्लेयर देखील म्हटले जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि त्याबरोबरच AI चा सपोर्ट देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही Google Pixel 8a ची त्याच्याच समान किंमत श्रेणीत येणाऱ्या OnePlus 12R शी तुलना करणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला दोन्ही फोनच्या टॉप स्पेक्सबद्दल माहिती देणार आहोत. या दोन नवीन युगातील फोनपैकी कोणता फोन तुमच्यासाठी अधिक चांगला आहे, ते बघुयात.
OnePlus 12R आणि Google Pixel 8a ची किंमत
Google Pixel 8a स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 52,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 59,999 रुपयांना मिळेल. दुसरीकडे, OnePlus 12R चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 38,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनचा 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 45,999 रुपयांना मिळेल.
OnePlus 12R VS Google Pixel 8a
डिझाईन
Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये एक सुप्रसिद्ध डिझाइन आहे, जे यापूर्वी देखील पाहिले आहे. या फोनमध्ये राउंड एजेस आहेत, याशिवाय तुम्हाला फोनच्या मागील पॅनलवर एक हॉरिझंटल स्ट्रॅप देखील मिळतो. या व्यतिरिक्त, OnePlus 12R फोनमध्ये तीन बेझलसह एक आकर्षक गोलाकार कॅमेरा सेटअप आहे. OnePlus चा हा फोन डिझाईनच्या बाबतीत खूपच आधुनिक दिसतो.
डिस्प्ले
Google Pixel 8a स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या FHD+ OLED डिस्प्लेसह येतो, जो 120Hz रिफ्रेश रेटवर सादर करण्यात आला आहे. दुसरीकडे, OnePlus 12R मध्ये तुम्हाला 6.78-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल, जो तुम्हाला उत्तम व्युइंग एक्सपेरियन्स देतो.
प्रोसेसर
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर आहे. मात्र, OnePlus 12R बद्दल बोललो तर यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर आहे. या प्रोसेसरच्या मदतीने तुम्ही गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज करू शकता.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी दोन्ही फोनमध्ये अप्रतिम कॅमेरे आहेत. Pixel 8a स्मार्टफोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा सेटअप आहे, फोनमध्ये 13MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स देखील आहे.
तर दुसरीकडे, OnePlus 12R फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. यात 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील आहेत.
बॅटरी
OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये वेगवान चार्जिंग स्पीडसह मोठी बॅटरी आहे. या कारणास्तव हा फोन Google Pixel 8a पेक्षा चांगला असल्याचे बोलले जात आहे. OnePlus 12R मध्ये 5,500 mAh बॅटरीसह 100W SuperVOOC फास्ट चार्जींग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Google Pixel 8a मध्ये अगदी मजबूत 4492mAh बॅटरी आहे, जी 18W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
निष्कर्ष
OnePlus 12R ला चांगल्या परफॉर्मन्ससह व्हॅल्यू फॉर मनी डिवाइस म्हटले जाऊ शकते. हा फोन कमी किमतीत मोठा डिस्प्ले, उत्तम परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी देतो. येथे आम्ही तुम्हाला आमचे मत सांगितले आहे. पण तुम्ही तुमच्या गरजा आणि आवडीनुसार फोनची निवड करणे, योग्य ठरेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile