OnePlus 12R चा नवीन सनसेट ड्युन कलर ऑप्शन भारतात लाँच
OnePlus 12R च्या नवीन कलर व्हेरिएंटसह OnePlus Buds 3 मोफत
OnePlus 12R मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
OnePlus ने या वर्षीच्या सुरुवातीला OnePlus 12R स्मार्टफोन लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनचे वेगवेगळे मॉडेल लाँच केले जात आहेत. काही काळापूर्वीच कंपनीने या स्मार्टफोनचे Genshin Impact मॉडेल लाँच केले आहे. मात्र, आता कंपनीने या स्मार्टफोनचा आणखी एक फोन नवीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. आता कंपनीने OnePlus 12R चा नवीन सनसेट ड्युन कलर ऑप्शन भारतात लाँच केला आहे. जाणून घेऊयात नवीन फोनची किंमत आणि सर्व तपशील-
OnePlus 12R Sunset Dune कलर मॉडेल कंपनीने 42,999 रुपये किमतीत लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम+256GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन ICICI बँक आणि OneCard क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 3000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय, जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला OnePlus Buds 3 मोफत मिळतील. OnePlus 12R च्या या नवीन कलर मॉडेलची विक्री येत्या 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
OnePlus 12R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा ओरिएंटल AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चे संरक्षण देखील ग्राहकांना मिळेल. यासह, या फोनमध्ये तुम्हाला ॲल्युमिनियम अलॉय मेटल मिडल फ्रेम मिळेल. याशिवाय फोनच्या मागील बाजूस ग्लास बॉडी देण्यात आली आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे, जो गेल्या वर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे.
फोटोग्राफीसाठी, OnePlus 12R मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX890 सेन्सर आहे. याशिवाय, या फोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2MP मॅक्रो लेन्स देखील उपलब्ध आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली गेली आहे. या बॅटरीसह तुम्हाला 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंगचे समर्थन मिळते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.