16GB RAM सह OnePlus 12R ची सेल भारतात सुरु, पहिल्या सेलमध्ये होतोय Best ऑफर्सचा वर्षाव। Tech News
OnePlus 12R या स्मार्टफोन्सची विक्री सुरु झाली आहे.
ICICI बँक आणि OneCard द्वारे 1000 रुपयांपर्यंत सूट
सहज खरेदीसाठी तुम्हाला या फोनवर नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील मिळेल.
OnePlus ने गेल्या महिन्यात भारतात आपली लेटेस्ट OnePlus 12 सीरीज लाँच केली. या लाइनअपमध्ये OnePlus 12 आणि OnePlus 12R या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. टॉप-एंड फ्लॅगशिप आता खरेदीसाठी उपलब्ध आहे, तर OnePlus 12R व्हेरिएंटची विक्री आज 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि ऑफलाइन स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. जाणून घेऊयात नवीन स्मार्टफोनवरील सर्व ऑफर्स-
OnePlus 12R ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus 12R स्मार्टफोनची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते. तर फोनच्या टॉप 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपयांपर्यंत जाते. या स्मार्टफोनमध्ये कूल ब्लू आणि आयर्न ग्रे असे कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत.
पहिल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना ICICI बँक आणि OneCard द्वारे 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत 4000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते. याशिवाय, सहज खरेदीसाठी तुम्हाला या फोनवर नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील मिळेल. येथून खरेदी करा
OnePlus 12R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12R फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPO 4.0 कर्व AMOLED ProXDR डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा डिस्प्ले गोरिला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे देखील संरक्षित आहे. स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 CPU आणि Adreno 740 GPU देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनच्या रियरमध्ये 50MP OIS + 8MP अल्ट्रावाइड + 2MP मॅक्रो रिअर लेन्स देण्यात आले आहेत. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी हा स्मार्टफोन 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. फोनला पॉवर करण्यासाठी, त्यात 5500mAh बॅटरी बसवण्यात आली आहे जी 100W चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, डिव्हाइसच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये WiFi 7, ब्लूटूथ 5.3, NFC, IR ब्लास्टर आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. डिव्हाइस OxygenOS 14 वर कार्य करेल, जे Android 14 वर आधारित आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile