लेटेस्ट OnePlus 12R स्मार्टफोनने जानेवारी 2024 मध्ये OnePlus 12 सोबत भारतीय बाजारपेठेत जबरदस्त एंट्री केली. हे दोन्ही स्मार्टफोन पॉवरफुल प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतात. दरम्यान, OnePlus 12R ची पहिली सेल आज म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. पहिल्या सेलमध्ये अनेक ऑफर्ससह स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
एवढेच नाहीतर, स्मार्टफोन खरेदी केल्यावर कंपनीच्या ग्राहकांना पहिल्या सेलमध्ये इयरबड्सदेखील मोफत मिळत आहेत. याशिवाय निवडक बँक कार्डवरही सूट दिली जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 12R 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-
OnePlus 12R 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, 16GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येणाऱ्या टॉप व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन कूल ब्लू आणि आयर्न ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. OnePlus 12R स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजतापसून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus Buds Z2 पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर मोफत उपलब्ध आहेत. तसेच, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर ICICI आणि OneCard वर 1000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. येथून खरेदी करा
OnePlus 12R 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED ProXDR डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तर, टच सॅम्पलिंग रेट 1000Hz पर्यंत आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो. डिवाइस Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर चालेल. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये eSIM सपोर्ट आणि ब्लूटूथ 5.3 सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तर, सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, पॉवरसाठी नवीनतम स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.