प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus चे स्मार्टफोन्स भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. कंपनी नवीन वर्षात आपली आगामी नंबर सिरीज OnePlus 13 भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी सिरीजच्या लाँचची प्रतीक्षा टेक विश्वात सुरु आहे. मात्र, त्याआधी कंपनीचे जुने मॉडेल्स मोठ्या प्रमाणात स्वस्त आणि सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सध्या OnePlus 12 वर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येत आहेत. तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर, पुढील ऑफर्स तपासा-
Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo Y300 Plus 5G वर तब्बल 8000 रुपयांचा Discount, ‘ही’ डील चुकवू नका
OnePlus 12 फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 69,999 रुपये इतकी आहे. मात्र सवलतीसह हा स्मार्टफोन सध्या 64,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. इतकेच नाही तर, या फोनवर बँक कार्डवर प्रचंड सवलतही उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला थेट 7000 रुपयांची सूट मिळत आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा.
OnePlus 12 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तसेच, या फोनमध्ये एक्वा टच टेक्नॉलॉजी सुद्धा आहे, ज्यासह तुम्ही ओल्या हातांनीही फोनचा डिस्प्ले वापरण्यास सक्षम असाल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 आधारित OxygenOS वर कार्य करतो.
याव्यतिरिक्त, OnePlus 12 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये तुम्हाला एक 64MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, 50MP सेकंडरी कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 12 फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज समाविष्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.