लोकप्रिय ब्रँड OnePlus च्या आगामी फोनबद्दल टेक विश्वात सध्या चर्चा सुरु आहे. आता OnePlus 12 शी संबंधित एक मोठा लीक समोर आला आहे. लीक्समध्ये फोनची बॅटरी आणि चार्जिंग टेक्नॉलॉजी, कॅमेरा सेन्सर्स, प्रोसेसर आणि डिस्प्लेबद्दल माहिती पुढे आली आहे. हे महत्त्वाचे तपशील एका टिपस्टरने ट्विटद्वारे शेअर केले आहेत.
OnePlus 12 मार्केटमध्ये यायला अजून बराच कालावधी लागणार आहे. लीक्सनुसार हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यापर्यंतच बाजारात लाँच होईल. हा स्मार्टफोन प्रथम चीनमध्ये आणि नंतर भारतासह इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 12 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीची मोठी स्क्रीन दिली जाईल. हा क्वाड HD रिझोल्यूशन डिस्प्ले 120Hz रीफ्रेशरेटसह असेल जो QLED पॅनेलवर तयार केला जाईल. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देण्यात येणार असल्याची माहिती लीकमध्ये समोर आली आहे. मात्र, Qualcomm ने हा चिपसेट अजून अधिकृत केलेला नाही.
याव्यतिरिक्त, लीकनुसार या फोनमध्ये 50MP चा प्राइमरी सेन्सर आहे. ज्यामध्ये 50MP चा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 64MP चा पेरिस्कोप लेन्स देखील असेल. स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.