OnePlus 13 लाँच होण्यापूर्वी OnePlus 12 झाला स्वस्त! मिळतोय तब्बल 8000 रुपयांच्या Discount

Updated on 08-Nov-2024
HIGHLIGHTS

टेक विश्वात सध्या OnePlus 13 च्या भारतीय लाँचची चर्चा रंगली आहे.

नवा फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनीने जुने मॉडेल OnePlus 12 स्वस्त केली आहे.

OnePlus 12 फोन सध्या 8000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध

फ्लॅगशिप किलर OnePlus ने या वर्षी सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात OnePlus 12 सिरीज भारतीय बाजारात लाँच केली होती. दरम्यान, आता टेक विश्वात OnePlus 13 च्या भारतीय लाँचची चर्चा रंगली आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. OnePlus चे चाहते भारतात देखील या फोनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. मात्र, नवा फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनीने जुने मॉडेल OnePlus 12 स्वस्त केली आहे. सध्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा फोन स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घेऊयात OnePlus 12 ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: व्हॉइस कंट्रोलसह येणारे जबरदस्त Smart TV! मिळेल टीव्ही पाहण्याचा शानदार अनुभव, पहा यादी

OnePlus 12 ची किंमत आणि ऑफर्स

लोकप्रिय OnePlus 12 फोनच्या 12GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये इतकी आहे. मात्र, 3000 रुपयांच्या सवलतीसह हा फोन 61,999 रुपयांना Flipkart वर खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डद्वारे OnePlus 12 फोनचे पेमेंट केल्यास 5,000 रुपयांपर्यंत स्वतंत्र सूट मिळत आहे.

अशाप्रकारे, तुम्ही हा फोन फक्त 56,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असाल. OnePlus 12 फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनची किंमत आणि ऑफर्स जवळपास बदलत असतात. या फोनमध्ये सिल्की ब्लॅक, फ्लोई एमराल्ड आणि ग्लेशियल व्हाइट कलर पर्याय उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. Snapdragon 8 Gen 3 उच्च CPU आणि GPU फ्रिक्वेन्सी, सुधारित आर्किटेक्चर आणि उत्तम उर्जा कार्यक्षमतेसह उत्कृष्ट कार्यप्रदर्शन देतो. हा एक स्मूथ आणि अधिक प्रतिसाद देणारा वापरकर्ता अनुभव सुनिश्चित करून गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी आदर्श बनवतो. त्याबरोबरच, हा फोन Android 14 आधारित OxygenOS वर कार्य करतो.

OnePlus 12 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये आकर्षक फोटोग्राफी करण्यासाठी 64MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, 50MP सेकंडरी आणि 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. तसेच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे, ज्यासोबत तुम्हाला 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, 50W वायरलेस चार्जिंग स्पीड देखील मिळेल.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :