OnePlus 12 ची भारतीय किंमत लाँच होण्यापूर्वीच उघड, तुमच्या बजेटमध्ये बसेल का Latest स्मार्टफोन? Tech News

Updated on 19-Jan-2024
HIGHLIGHTS

OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार

चुकून OnePlus 12 ची किंमत Amazon वर लाइव्ह करण्यात आली होती.

फोनमध्ये OIS सह 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा उपलब्ध

OnePlus ची OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहेत. या आगामी स्मार्टफोन सिरीजची OnePlus चे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. नवीन फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन्सबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक लीक्स समोर आले आहेत. ताज्या अहवालानुसार, फोन बाजारात येण्यापूर्वीच OnePlus 12 ची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. चुकून या मोबाईलची किंमत शॉपिंग साइट Amazon वर लाइव्ह करण्यात आली, असे देखील सांगण्यात आले आहे. बघुयात फोनची अपेक्षित किंमत-

OnePlus 12 ची लीक भारतीय किंमत

या वीकेंडला ई-कॉमर्स साइट Amazon कडून चुकून OnePlus 12 चे प्रोडक्ट पेज लाइव्ह झाले आहे. कंपनीने फोन लाँच करण्यापूर्वीच त्याचे फोटो, स्पेसिफिकेशन्स आणि प्राईसची माहिती पब्लिक केली. Amazon वर OnePlus 12 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 69,999 रुपये दाखवण्यात आली होती. हा फोनचा फ्लोई एमराल्ड कलर मॉडेल होता. ही चूक ताबडतोब सुधारली गेली तरीही टिपस्टर इशान अग्रवालने या चुकीचा स्क्रीनशॉट घेऊन तो सोशल मीडियावर शेअर केला. तुम्ही स्क्रिनशॉट पुढील पोस्टमध्ये बघू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की, काही लीकनुसार OnePlus 12 स्मार्टफोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट $799 मध्ये म्हणजेच सुमारे 66,399 रुपयांमध्ये लाँच केला जाईल. त्याबरोबरच, फोनच्या 16 GB RAM + 512 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $899 म्हणजेच सुमारे 74,699 रुपये असेल.

OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12 पूर्वीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतीय व्हेरिएंटदेखील समान फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, OnePlus 12 5G फोन 6.82 इंच लांबीच्या 2K डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 120Hz रिफ्रेश रेटसह OLED पॅनेलवर तयार केला गेला आहे. यात क्वालकॉमचा सर्वात पॉवरफुल मोबाइल चिपसेट Snapdragon 8 Gen 3 प्रदान करण्यात आला आहे.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात OIS सह 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा, 48MP Sony IMX581 अल्ट्रावाइड लेन्स आणि 3x पेरिस्कोप झूम लेन्ससह 64MP ओम्निव्हिजन OV64B सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 5,400mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :