नव्या आकर्षक रंगात भारतात लाँच झाला लेटेस्ट OnePlus 12, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
OnePlus 12 स्मार्टफोन नवीन ग्लेशियल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये लाँच
निवडक बँक कार्डसह पेमेंट व्यवहार केल्यास नवीन कलर फोनवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट
20 जूनपूर्वी OnePlus 12 खरेदी केल्यास त्यांना कूपन देखील मिळेल.
OnePlus 12: OnePlus ने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये आपला लेटेस्ट फ्लॅगशिप OnePlus 12 फोन भारतात लाँच केला होता. भारतीय ग्राहकांनी या नव्या फोनला कमालीची पसंती दर्शवली. त्यांनतर, आता OnePlus 12 स्मार्टफोन नवीन ग्लेशियल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला गेला आहे. यापूर्वी, हा फोन भारतात फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होते.
Also Read: Best Offer! आतापर्यंतच्या स्वस्त किमतीत मिळतोय Oneplus 11R, बघा किंमत आणि सर्व ऑफर्स। Tech News
OnePlus 12 नव्या रंगात सादर
लेटेस्ट OnePlus 12 स्मार्टफोन ‘ग्लेशियल व्हाइट’ कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा नवा कलर व्हेरिएंट ग्लॉसी फिनिश खूपच कूल दिसतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 12 Glacial White Edition ला भारतात सिंगल स्टोरेजमध्ये एंट्री देण्यात आली आहे.
OnePlus 12 Glacial White Edition ची भारतीय किंमत
OnePlus 12 Glacial White Edition डिव्हाइसच्या एकमेव 12GB RAM + 256GB स्टोरेज पर्यायाची किंमत 64,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा मोबाईल 6 जूनपासून Amazon, OnePlus eStore, OnePlus Experience Stores आणि इतर रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus निवडक बँक कार्डसह पेमेंट व्यवहार केल्यास नवीन कलर फोनवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट देत आहे. वापरकर्त्यांनी 20 जूनपूर्वी डिव्हाइस खरेदी केल्यास त्यांना 2,000 रुपयांचे कूपन देखील मिळू शकते. कंपनी 12,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI पर्याय देखील ऑफर करेल.
OnePlus 12 चे स्पेसीफिकेशन्स
OnePlus 12 Glacial White एडिशनमध्ये 6.82-इंच लांबीचा QHD+ 2K OLED LTPO ProXDR डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेटसह आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 देखील बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट मिळेल. पॉवरसाठी, डिव्हाइसमध्ये मोठी 5,400mAh बॅटरी, 100W SuperVOOC फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी, वनप्लस 12 ग्लेशियल व्हाइट कलर फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सह 50MP Sony LYT-808 प्राथमिक, 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड अँगल आणि 3x टेलिफोटो झूमसह 64MP OV64B पेरिस्कोप लेन्स मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP Sony IMX615 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile