digit zero1 awards

 50MP प्रायमरी, 64MP पेरिस्कोप कॅमेरा आणि Interesting फीचर्ससह सुसज्ज असेल OnePlus 12, कंपनीने केले कन्फर्म। Tech News 

 50MP प्रायमरी, 64MP पेरिस्कोप कॅमेरा आणि Interesting फीचर्ससह सुसज्ज असेल OnePlus 12, कंपनीने केले कन्फर्म। Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 12 लवकरच टेक विश्वात लाँच केला जाणार आहे.

ब्रँडने एका कार्यक्रमादरम्यान OnePlus 12 च्या कॅमेरा आणि डिस्प्लेच्या फीचर्सची पुष्टी केली आहे.

OnePlus 12 मध्ये Sony LYT-808 फ्लॅगशिप प्राइमरी सेन्सर असेल.

फ्लॅगशिप किलर OnePlus च्या आगामी स्मार्टफोनची चर्चा टेक विश्वात सुरु झाली आहे. कंपनीचा नवीन फ्लॅगशिप फोन OnePlus 12 लवकरच चीनमध्ये लाँच होऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये मोबाइल होम मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतासह जागतिक बाजारपेठेत फोन दाखल करून दिला जाईल. फोनच्या घोषणेपूर्वी ब्रँडने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या कॅमेरा आणि डिस्प्लेच्या फीचर्सची पुष्टी केली आहे.

हे सुद्धा वाचा: Google Pixel 7a वर तब्बल 8 हजार रुपयांची थेट सूट, Diwali Sale मध्ये हा फोन स्वस्तात खरेदी करा। Tech News

OnePlus 12 चे कन्फर्म फीचर्स

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रँडने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये सांगण्यात आले आहे की, OnePlus 12 मध्ये Sony LYT-808 फ्लॅगशिप प्राइमरी सेन्सर असेल. फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरासह पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा 3x ऑप्टिकल झूम, 70 मिमी फोकल लेन्थ, स्पिन कोटिंग IR फिल्टर, F/2.6 मोठे अपर्चर आणि ALC सबवेव्हलेंथ स्ट्रक्चरल कोटिंगसह असेल.

Oneplus 12 Camera details
Oneplus 12 Camera details

फोनच्या ट्रिपल कॅमेऱ्यामध्ये मिळणाऱ्या अल्ट्रा-वाइड लेन्सबद्दल अद्याप माहिती पुढे आली नाही, मात्र ते 48MP अल्ट्रा-वाइड असू शकते. OnePlus ने इव्हेंटमध्ये कॅमेरा फीचर्ससह काही इमेजेस देखील शेअर केल्या आहेत. याशिवाय, नवीन टीझरमध्ये OnePlus 12 2K ProXDR डिस्प्लेने सुसज्ज असल्याचे म्हटले आहे.

OnePlus 12चे संभावित स्पेसीफिकेशन्स

OnePlus 12 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच लांबीचा 2K BOE X1 OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. OnePlus 12 फोन पॉवरफुल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो, जो अलीकडेच बाजारात लाँच झाला आहे. मोबाइलमध्ये 24GB RAM आणि 1TB अंतर्गत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

लीकनुसार, OnePlus 12 ला दीर्घकाळ टिकणारी 5,400mAh बॅटरी, 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग दिली जाईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5G सारखी अनेक फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. फ्लॅगशिप फोन OnePlus 12 नवीनतम Android 14 आधारित ऑक्सिजन OS 14 वर आधारित असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo