प्रसिद्ध OnePlus स्मार्टफोन निर्माता डिसेंबरमध्ये उद्योगक्षेत्रात एक दशक पूर्ण झाल्याचा उत्सव
4 डिसेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
या कार्यक्रमात OnePlus 12 आणि OnePlus Ace 3 आगामी फोन्स लाँच केले जातील.
OnePlus ने कंपनीच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त 4 डिसेंबर रोजी आपला फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. OnePlus 12 या दिवशी लाँच केला जाईल. यासोबतच, बहूचर्चित असलेला OnePlus Ace 3 देखील लाँच केला जाऊ शकतो. आपण बघतच आहोत की, या दोन्ही फोन्सबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. लाँच पूर्वी याबाबत अनेक तपशील देखील उघड झाले आहेत. वाचा सविस्तर-
OnePlus 12 ची लाँच डेट
प्रसिद्ध OnePlus स्मार्टफोन निर्माता 4 डिसेंबर रोजी उद्योगक्षेत्रात एक दशक पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Weibo वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यानुसार हा कार्यक्रम संध्याकाळी 7:00 वाजता ( IST संध्याकाळी 4:30 वाजता) होणार आहे. या इव्हेंटमध्ये वर सांगितलेली उपकरणे लाँच करण्यात येणार आहेत.
OnePlus 12 चे संभावित फीचर्स
लीकनुसार, या फोनमध्ये K PROXDR रिझोल्यूशनसह 6.82 इंच लांबीचा LTPO AMOLED पॅनेल असेल. यात OPPO P1 डिस्प्ले चिप आणि पंच-होल कटआउट दिले जाऊ शकते. त्याबरोबरच, हा फोन Adreno GPU सह Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC वर काम करू शकतो. फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज देखील देण्यात येईल.
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असू शकतो, ज्याचा प्रायमरी सेन्सर OIS सह 50MP Sony LYT-808 सेन्सर असू शकतो. तर, दुसरा 50MP अल्ट्रावाइड Sony IMX581 सेन्सर अपेक्षित आहे. याशिवाय, 64MP 3x टेलिफोटो झूम लेन्स देखील OIS सह प्रदान केले जाऊ शकतात. त्याबरोबरच, फोनमध्ये 5400mAh बॅटरी 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह प्रदान केली जाऊ शकते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.