लाँचपूर्वी OnePlus 12 आणि OnePlus 12R फोनची किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये येतील का आगामी स्मार्टफोन्स? Tech News 

लाँचपूर्वी OnePlus 12 आणि OnePlus 12R फोनची किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये येतील का आगामी स्मार्टफोन्स? Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोन 23 जानेवारीला भारतात लाँच होणार

OnePlus 12 फोन OnePlus 11 पेक्षा महाग असण्याची शक्यता आहे.

OnePlus 12R फोन हा त्याचा परवडणारा व्हेरिएंट असू शकतो.

बहुप्रतीक्षित OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोन 23 जानेवारीला भारतात लाँच होणार आहेत. लाँच होण्यापूर्वी या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. लीक झालेल्या किंमतीनुसार, OnePlus 12 फोन OnePlus 11 पेक्षा महाग असण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, OnePlus 12R फोन हा त्याचा परवडणारा व्हेरिएंट असू शकतो. बघुयात आगामी स्मार्टफोन्सची लीक किंमत-

OnePlus 12 आणि OnePlus 12R ची लीक किंमत

oneplus 12
ONEPLUS 12

लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे. लीकनुसार, OnePlus 12 स्मार्टफोनची किंमत US मध्ये $799 म्हणजेच अंदाजे 66,400 असण्याची शक्यता आहे, ही किंमत फोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी असेल. तर, फोनच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $899 म्हणजेच अंदाजे 74,000 रुपये असेल.

याव्यतिरिक्त, OnePlus 12R स्मार्टफोनच्या बेस 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $499 म्हणजेच अंदाजे 35,000 रुपये असेल. तर, 16GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $599 म्हणजेच अंदाजे 35,000 रुपये असण्याची शक्यता आहे.

OnePlus 12 चे फीचर्स

OnePlus 12R/Ace 3

आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 12 फोन भारतापूर्वी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा क्वाड-HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, फोन स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी 4nm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये तब्बल 24GB रॅमची सुविधा देण्यात आली आहे.

OnePlus चे स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. या OnePlus फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासोबत OIS सपोर्ट मिळेल. यामध्ये 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 64MP OV64B पेरिस्कोप सेन्सरचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5,400mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo